|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दोघा अट्टल घरफोडय़ांना अटक

दोघा अट्टल घरफोडय़ांना अटक 

प्रतिनिधी/ बेळगाव

सीसीबी व एपीएमसी पोलिसांनी बुधवारी दोघा अट्टल घरफोडय़ांना अटक केली आहे. शहर व उपनगरांत या जोडगोळीने 10 हून अधिक घरफोडय़ा केल्याचे उघडकीस आले असून पोलीस त्यांची कसून चौकशी करीत आहेत.

सीसीबीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. शहर व उपनगरांतील वाढत्या घरफोडय़ा व चोऱयांच्या तपासाचे आव्हान पोलीस दलासमोर उभे ठाकले होते. पोलीस आयुक्त टी. जी. कृष्णभट्ट, उपायुक्त अमरनाथ रेड्डी आदी अधिकाऱयांनी गुन्हेगारांची धरपकड करण्यासाठी अधिकाऱयांना सूचना केल्या होत्या.

बुधवारी सीसीबी व एपीएमसी पोलिसांनी गणेश सुरेश तुबाके (वय 24, रा. सुतगट्टी), निलेश लक्ष्मण बडमंजी (वय 20, रा. महाद्वार रोड) यांना संशयावरून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता या जोडगोळीने शहर व उपनगरांत 10 हून अधिक ठिकाणी घरफोडय़ा केल्याची कबुली दिली आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी करण्यात येत होती. 

Related posts: