|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » यल्लम्मा यात्रेचा आज मुख्य दिवस

यल्लम्मा यात्रेचा आज मुख्य दिवस 

बाळेपुंद्री / वार्ताहर

कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीचे बुधवार रात्री उशिरा असंख्य भाविकांनी दर्शन घेतले. उद्या गुरुवार हा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने डोंगरावर सुमारे चार लाखाहून अधिक भाविकांचा जनसागर लोटण्याची शक्यता आहे. भाविकांच्या सोयीसाठी फिरत्या स्वच्छतागृहांची प्रशासनाने सोय केली आहे. स्वच्छतेसंदर्भात अनेकांनी तक्रारी केल्यानंतर याकडे लक्ष देऊन डोंगरावर स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

डोंगरावर स्वच्छता राखावी

 गेल्या दोन दिवसांपासून जोगणभावी परिसरात स्नानासाठी भाविक गर्दी करत असल्याने प्रशासनावर स्वच्छतेसाठी ताण पडला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. ग्रामोपाध्ये यांनी अधिकाऱयांना व कामगारांना जोगणभावी परिसरात स्वच्छता राखण्याबाबत सूचना दिल्या आहेत. देवस्थान परिसरात होणारी हागणदारी तसेच भाविकांकडून टाकण्यात येणारे शिळे अन्न, खाद्य पदार्थ जागेवरच टाकण्यात येत असल्यामुळे परिसरात दुर्गंधीला सामोरे जावे लागते. दुर्गंधी फैलावू नये म्हणून यासाठी ठिकठिकाणी कचरा कंटेनरचे नियोजन करण्यात आले असून भाविकांनी परिसर स्वच्छतेची अधिक दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.  

Related posts: