|Friday, October 18, 2019
You are here: Home » Top News » पाकिस्तान लवकरच करणार जवान चंदु चव्हणची सुटका

पाकिस्तान लवकरच करणार जवान चंदु चव्हणची सुटका 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेला जवान चंदु चव्हणची लवकरच सुटका होणार असून तो मायदेशी परतणार असल्याची माहिती केंदीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे.

मुळचे धुळयाचे असणारे 22 वर्षाचे चंदू चव्हाण 37 राष्ट्रीय रायफल्समध्ये सेवा बजावत होते. 30 सप्टेंबरला गस्त घालत असताना चंदू चव्हाण यांनी नजरचुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला. यानंतर चंदू चव्हाण यांना पाकिस्तानच्या सैन्याने ताब्यात घेतले. तेव्हापासून चंदू चव्हाण पाकिस्तानमध्ये आहेत. ‘चंदू चव्हाण यांच्याविषयी दोनच दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या डिजीएमओंसोबत चर्चा झाली. चंदू चव्हाण सुरक्षित असून त्यांची चौकशी अंतिम टप्प्यात आली आहे, लवकरच त्यांची सुटका करण्यात येईल अशी महिती पाकिस्तानच्या डिजीएमओंनी दिली असल्याचे सुभाष भामरे यांनी सांगितले.