|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » व्यवसायिकांकडून चिमुकल्यांची पिळवणूक

व्यवसायिकांकडून चिमुकल्यांची पिळवणूक 

प्रतिनिधी/ कडेगांव

देशाचे उज्वल भविष्य ज्या बालकांच्या हातात आहे.ती बालके खेळायच्या वयात मोलमजुरी करून पोटाची खळगी भरत आहेत.कडेगाव तालुक्यासह जिल्हतच सर्वच ठिकाणी अनेक हाँटेल,ढाबे,वडापावचे गाडे,चायनीजच्या गाडयासह बेकायदा दारूगुत्यावर अनेक बालकामगारांना जनावरोसारखे राबवून घेतले जात आहे.आणि त्यातच त्यांच बालपण हरवले आहे.बालपण म्हणजे काय हे अनुभवाच्या अगोदरच या मुलांना अकाली प्रौढत्व आल्याचे पहावयास मिळत आहे.

  आज सगळीकडे बळी तो कानपिळी अशी अवस्था पहावयास मिळत आहे.आणि मालक माजोर बनले आहेत.व्हाईट काँलर असलेल्या बडया धेंडा च्या जाचातून सुटण्यासाठी धडपडणाऱया बालकामगारांना वाचविण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय चिमुकल्यांची माय होणार का  असा सवाल उपस्थित केला जात आहे.

  जिल्हात मोठया शहरात,तालुक्याच्या ठिकाणी ते अगदी खेडयापर्यंत हाँटेल,ढाबे,वडापावचे गाडे,चायनिजच्या गाडयावर बालकांना न पेलणारे काम लागले जात आहे.मोठया प्लास्टिक कँनमध्ये फार दूरवरून पाणी आणावे लागते.लहान वयात न  झेपणारे काम लावल्यामुळे या कोवळया जीवाची कुचंबना होत आहे.हाँटेल,ढाबे,वडापावचे गाडे,चायनिजच्या गाडयावर वेटरचे काम,भांडी धुणे,पोछा मारणे यासारखी कामे लावून त्यांचे शोषण केले जाते.या कामाचा मोबदला त्यांना दोन वेळचे अन्न दिले जाते.दोन वेळेच्या अन्नासाठी इवलासा जीव काबाडकष्ट करत आहे.अनेकदा कामामध्ये काही चुकी झाली तर मालकाकडून बेदम मार केली जाते.परंतू तक्रार करायची कोणाकडे    असा प्रश्न पडतो.ज्यांच्या डोक्यावर मायेचा हात नाही अशा चिमुकल्यांना त्रास सोसण्याशिवाय पर्याय नसतो.

  शहरातील व ग्रामीण भागातही ढाबे,चायनिज गाडे,वडापावचे गाडे आदी विविध दुकानात बालकामगारांची संख्या लक्षणीय आहे.सहाय्यक बालकामगार आयुक्त कार्यालयाने केवळ बालदिन साजरे करून नये.बडया धेंडाच्या तावडीतून चिमुकल्यांना सोडविण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

 देशाचे उज्वल भविष्य ज्या बालकांच्या हातात आहे.ती बालके खेळायच्या,बागडायच्या व शिक्षण व्यवसाय घ्यायच्या वयात मोलमजुरी करून पोट भरत आहेत.अशा निरागस व लहान मुलांच्या शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आवश्यक आहे.घाण्याच्या बैलासारखे बालकांना राबवले जात असताना शासन 14 वर्षौखालील मुले शिक्षणापसून वंचित राहू नये,म्हणून सर्व शिक्षाा अभियानातंर्गत मोठया निधीची दरवर्षी तरतूद करते.दरवर्षी कोटयावधी रूपयांची निधी खर्च केल्याचे कागदपत्राव्दारे दाखले जाते त्यांनंतर मोठे मोठे आकडे प्रसिध्द करून एवढी मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणली असल्याची वल्गना केल्या जातात.मात्र वस्तुतिथी भयानक असल्याचे सध्या स्थितीवरून दिसते.

  कागदपत्री अमंलबजावणीपेक्षा मुळापासून बालमजूरीचा बिमोड करणे गरजेचे आहे.यासाठी सुस्तावलेल्या शासन व्यवस्थेने कात टाकून नव्या जोमाने कामाला लागावे.अन्यथा उदयाचे सोनेरी भविष्य आजच काळोख्या अंधाराच्या खाईत लोटेल.आता मजूर बालकांना बचावनारा देण्याची वेळ आली आहे.सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाने या बालकामगार प्रकरणाकडे कानाडोळा न करता निबरगठट व्यवसायीकावर कारवाई करताना कोणाच्या दबावाला बळी पडू नये अशी मागणी व्यक्त केली जात आहे.