|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » केंद्र सरकारने नव्या रुपात सादर केले पॅनकार्ड

केंद्र सरकारने नव्या रुपात सादर केले पॅनकार्ड 

नवी दिल्ली

 नव्या डिजाइनचे स्थायी खाते क्रमांक (पॅन) कार्ड जारी करण्यास सरकारने सुरू केले आहे. यात अतिरिक्त सुरक्षा वैशिष्टय़े अंतर्भूत करण्यात आली आहेत. यामुळे कोणत्याही प्रकारची छेडछाड करणे शक्य होणार नाही. यावर मजकूर हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये लिहिण्यात आलेला आहे. प्राप्तिकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने याची माहिती दिली. नव्या रुपातील पॅनकार्डची निर्मिती एनएसडीएल तसेच यूटीआय इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिसेस लिमिटेडने केली आहे. याचे वितरण 1 जानेवारीपासून सुरू झाले आहे. हे कार्ड नव्या अर्जदारांना जारी केले जात आहेत. नव्या पॅनकार्डचे वितरण एक जानेवारीपासून सुरू झाल्याचे परंतु हे फक्त नव्या अर्जदारांसाठी असल्याचे अधिकाऱयाने सांगितले. सरकारने या कार्डमध्ये नवे वैशिष्टय़ क्विक रेस्पॉन्स (क्यूआर) कोड जोडले आहे. यामुळे प्रमाणनाच्या प्रक्रियेत मदत मिळेल. देशभरात दरवर्षी अडीच कोटी लोक पॅनकार्डसाठी अर्ज करत असतात.