|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आष्टय़ात राष्ट्रवादी वैद्यकीय सेलच्यावतीने भिलवडी घटनेचा निषेध

आष्टय़ात राष्ट्रवादी वैद्यकीय सेलच्यावतीने भिलवडी घटनेचा निषेध 

वार्ताहर/ आष्टा

आष्टा येथे राष्ट्रवादी वैद्यकीय सेलच्यावतीने भिलवडी-माळवाडी येथील शाळकरी मुलीचा बलात्कार करुन खून केलेल्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी पोस्टर जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र आष्टा पोलिसांनी कार्यकर्त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.

आष्टा येथील बसस्थानक चौकात राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय सेलच्यावतीने व वैभवदादा युवा मंच यांच्या सहकार्याने भिलवडी-माळवाडी येथील शाळकरी मुलीचा बलात्कार करुन खून करणाऱया नराधमांना फाशी व्हावी, अशी मागणी करीत निषेध करण्यात आला. यावेळी माजी उपसभापती वैभवदादा शिंदे, राष्ट्रवादी वैद्यकीय सेलचे सरचिटणीस डॉ. तुषार कणसे, डॉ. रुपेश पाटील, डॉ. सचिन पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. महेश पाटील, डॉ. दिग्विजय पाटील, डॉ. मिलींद सपकाळ, डॉ. प्रफ्फुल आडमुठे, डॉ. विनायक माने, डॉ. धनपाल वाठारे, डॉ. विजय गंगधर, डॉ. ज्योतिराम मस्के, डॉ. सचिन कापसे, डॉ. विपुल गुरव, डॉ. शशीकांत माने, राजू आत्तार, संकेत पाटील, दिपक थोटे, दत्तराज हिप्परकर, दिपक पाटील, सुधीर सावंत, महावीर वाडकर, अमोल खंचनाळे, संतोष शिंदे यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. आष्टा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

यावेळी कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पोस्टर जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र आष्टा पोलिसांनी हस्तक्षेप करुन कार्यकर्त्यांना अडविले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा पोस्टर जाळण्याचा प्रयत्न हाणून पडला. उपस्थित पोलिसांनी कार्यकर्त्यांना शांत केले. यावेळी बोलताना वैभवदादा शिंदे म्हणाले, भिलवडी-माळवाडी येथील घटना माणूसकीला काळींमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी वैद्यकीय सेलही या घटनेचा तीव्र निषेध करीत आहे. अशा घटना घडणे माणूसकीला घातक आहे. शासनाने असे प्रकार रोखण्यासाठी प्रभावीपणे प्रयत्न करायला हवेत. पोलिसांनी तातडीने या प्रकरणातील आरोपींना पकडून फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत.

स्वागत डॉ. तुषार कणसे यांनी केले. आभार संकेत पाटील यांनी मानले.

Related posts: