|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगलीत चित्रपट निर्मितीचे केंद्र शक्य

सांगलीत चित्रपट निर्मितीचे केंद्र शक्य 

संजय गायकवाड / सांगली

मुंबई पुणे आणि कोल्हापूर पाठोपाठ आता सांगलीसारख्या जिल्हयातही कमी बजेटच्या  मराठी चित्रपट निर्मितीचे केदं उभारणे शक्य आहे. याकामी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी पुढाकार घेतला आहे. पहिल्या टप्प्यात मराठी चित्रीकरणाचे केंद्र म्हणून तासगाव तालुक्यातील ‘सिध्देवाडी’  या गावाचे नाव पुढे आले असले तरी  नजिकच्या काळात सांगली शहर आणि जिल्हयातील अनेक ठिकाणे चित्रीकरणाची प्रमुख ठिकाणे म्हणून नावारूपास येऊ शकतात. यामुळे सांगली हे मराठी चित्रपट व मालिकांच्या चित्रीकरणांच्या दृष्टीनेच नव्हे तर सांगलीतील अर्थकारणाला चालना व रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने अशी केंद्रे म्हणचे मोठा हातभार ठरू शकतात.

बोल्ड करणे…………………सांगलीचा वेगळा नावलौकिक

सांगली हे व्यापारी पेठ, बाजारपेठ तसेच शैक्षणिक, क्रीडा, राजकीय ,सामाजिक अशा विविध क्षेत्रात अग्रेसर असणारे शहर आहे. शेती आणि शेतीपुरक व्यवसायामुळे सांगलीचा राज्यातच नव्हे तर देशभरातही एक वेगळा नावलौकिक आहे. सांगलीचा  आता भविष्यकाळात चित्रपट निर्मिती व त्याअनुषंगाने चालणारे छोटे मोठे व्यवसाय या दृष्टीने चित्रीकरणाचे एक ठिकाण म्हणून विचार होऊ शकतो. सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

बोल्ड करणे…………तर सांगली हेही चित्रपट निर्मितीचे चांगले केंद्र होऊ शकते.

  हिंदीच नव्हे तर मराठी चित्रपट निर्मातेही चित्रीकरणासाठी  जगभर फिरत असतात. हल्लीच्या चित्रपटाचे बजेटही कित्येक कोटीच्या घरात असते. त्यामुळे अशा बिग बजेटच्या चित्रपट निर्मात्यांना हे शक्य होते. पण सर्वच निर्मात्यांना आर्थिक दृष्टया हे परवडत नाही. त्यामुळे बरचशे निर्माते हे विशेषतः मराठी चित्रपट निर्माते , मालिका तयार करणाऱया संस्था आणि चॅनेल्सवाले हे महाराष्ट्रातच ठिकठिकाणी चित्रीकरण करत असतात. आर्थिकदृष्टया आणि कमी पैशात चित्रपट व मालिका बनविण्यासाठी व आर्थिक गणित बसविण्यासाठी दरवर्षी असे शेकडो चित्रपट व मालिका तयार होत असतात. त्यातील काही चित्रपट व मालिका यशस्वी होतात तर बरचशे चित्रपट केंव्हा आले व गेले हे समजतही नाही. हा भाग वेगळा पण चित्रीकरण आणि  त्याअनुषंगाने अर्थकारण व रोजगारनिर्मिती याचा विचार करून सांगली जिल्हयातही चित्रपट निर्मितीचे केदं तयार करण्याचा निर्णय आशादायी ठरू शकतो.

बोल्ड करणे……….सांगलीत यापुर्वी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण.

सांगली शहर आणि जिल्हयातही यापुर्वी अनेक मराठी चित्रपट व मालिकांचे चित्रीकरण झालेले आहे. सांगलीमध्ये यापुर्वी ‘संथ वाहते कृष्णामाई,’ ‘गंगू बाजारला जाते’ ‘पती हाच परमेश्वर’   ‘भैरू पैलवान की जय ’ ‘तांबडी माती’‘ नामदार गणप्या गावडे ’ ‘ कटयार काळजात घुसली ’ ‘फटाकडी’ ‘भिंगरी’ ‘पंढरीची वारी ’ दागिणा, सौभाग्यकंकण, पुत्रवती, दागिणा, बनगरवाडी,‘ राजकारण ’ यासह अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण झालेले आहे. तर साधारणपणे तीस ते पस्तीस वर्षापुर्वी वाळवा तालुक्यातील  ताकारी रेल्वे स्टेशन व तेथील ‘कमळ भैरव ’चा डोंगर या परिसरात ‘पाच नाजुक बोटे ’ या अतिशय गाजलेल्या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. या चित्रपटात त्याकाळी ताकारी परिसरातील अनेक स्थानिक लोकांना काम करण्याची संधी मिळाली होती. सांगलीतील  अण्णासाहेब घाटगे, अण्णासाहेब उपाध्ये आदी  स्थानिक मंडळीनी मराठी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात चांगले नाव कमाविले आहे. संगीतकार म्हणून सांगलीचे बाळ पळसुले यांचेही मराठी चित्रपट क्षेत्रात मोठे नाव आहे.   सांगलीतील कलाकार म्हणून  अरूण नाईक, पोर्णिमा पाटणकर, हेंमत जोशी, श्रीनिवास जरंडीकर, विजय कडणे, चंद्रकांत धामणीकर, धनंजय पाठक,  ,रवींद्र कुलकर्णी, यांना अनेक चित्रपटात  काम करण्याची संधी मिळाली होती. सदानंद जोशी यांच्या पुत्रवती या चित्रपटात बुधगाव, माधवनगर आणि सांगली परिसरातील चित्रीकरण झाले होते. हरिपूरमध्ये यापुर्वी अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण झालेले आहे. सांगलीमध्ये गणपती मंदिर, कृष्णा नदीचा घाटाचा परिसर, विश्रामबाग  गजानन मिल,वसंतदादा साखर कारखाना आदी भागात अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झालेले आहे. सांगलीतीलच पाठक यांची निर्मिती असलेल्या ‘लग्न मुबारक ’या नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सांगलीत सुरूवात होणार आहे.

चौकट करणे……………… मराठी चित्रपट निर्मात्यांना हे हवे.

सांगली व परिसरात अनेक निसर्गरम्य ठिकाणे असून चित्रीकरणाच्या दृष्टीने अगदी कमी बजेटचे चित्रपट बनविण्यासाठी या स्थळांचा चांगला उपयोग होऊ शकतो. त्यासाठी दळणवळणांच्या साधनासह  चांगली हॉटेल्स आवश्यक आहेत. यामुळे अनेक स्थानिक कलाकारांना काम मिळू शकते. जिल्हाधिकाऱयांनी पुढाकार घेऊन मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणांच्या दृष्टीने सांगली शहर व परिसराचा कायापालट व काही चांगली ठिकाणे विकसीत करण्यासाठी पावले उचलली तर ते स्वागर्ताह आहे.

 

Related posts: