|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » बलात्कार, जबरदस्तीने जिल्हय़ात संताप

बलात्कार, जबरदस्तीने जिल्हय़ात संताप 

अपहरण करून लोणंदच्या चिमुकलीवर बलात्कार,   कराडात पहाटे क्लासला निघालेल्या अल्पवयीनवर जबरदस्ती

वार्ताहर/ लोणंद

दिल्लीतील गँगरेपनंतर देशभर संतापाची लाट उसळली होती. तर त्यानंतरच महिलांची सुरक्षितता यावरही सर्वत्र अधिकारवाणीने  बोलले जाऊ लागले. साताऱया सारख्या सधन व पुरोगामी जिल्हय़ातही तरूणींवरील अत्याचार कमी होण्याचे नाव घेत नसून मंगळवारी अश्याच दोन घटनांनी संताप व्यक्त झाला. लोणंदमध्ये शाळेला निघालेल्या चिमुकलीचे अपहरण करून सलग चार दिवस बलात्काराचा गुन्हा नोंद झाला. तर मंगळवारीच पहाटे क्लासेसला निघालेल्या अल्पवयीन मुलीला भररस्त्यात अडवून तोंडाला रूमाल बांधुन एका नराधमाने जबरदस्ती केली. तीने लग्गेचच ओरडाओरडी केली त्यामुळे नराधमाने पळ काढला.

दरम्यान, लोणंद बलात्कार प्रकरणी चंद्रकांत कांबळे याला पोलीसांनी जेरबंद केले असून कराडच्या नराधमाचा शोध सुरू आहे.

अपहरण करून बलात्कार करणारा नराधम जेरबंद

जबरदस्तीने गाडीतून पळवून नेऊन 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला चार दिवस वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी चंद्रकांत भानुदास कांबळे (वय 21 वर्षे रा. चव्हाणवाडी ता. फलटण) यास लोणंद पोलिसांनी अटक केली आहे.

   याबाबत लोणंद पोलीस स्टेशनवरुन मिळालेली अधिक माहिती अशी की, दि 12 जानेवारी रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास टाकुबाईचीवाडी गावच्या हद्दीत टाकुबाईचीवाडी ते सासवड रोडवर अल्पवयीन मुलगी सासवड  येथे शाळेला पायी जात असताना चंद्रकांत भानुदास कांबळे (वय 21 वर्ष रा. चव्हाणवाडी, ता. फलटण) याने जबरदस्तीने मारूती गाडीत घालून तिला चार दिवस पळवून नेऊन तरडगाव, माळशिरस, व देवापूर अशा विविध ठिकाणी नेवून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करण्यात आला, अशी फिर्याद नवनाथ सुभाष झणझणे यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिली आहे. चंद्रकांत कांबळे यास लोणंद पोलिसांनी अटक केली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र औटे हे करीत आहेत.

त्या नराधमाचा कसून शोध सुरू

पहाटे सहा वाजता क्लासला निघालेल्या अल्पवयीन मुलीस अडवून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना कराडच्या श्री हॉस्पिटल परिसरात घडली. तोंडाला रूमाल बांधून आलेल्या अनोळखी नराधमाने मुलीस अडवून अत्याचार प्रयत्न केल्याने संतापाची लाट उसळली आहे.

याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात फिर्याद दाखल झाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत शहरात नाकाबंदी करून धरपकड सुरू केली. रेकॉर्डवरील गुन्हेगारांचीही चौकशी करण्यात आली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रूक्मिणीनगर येथे राहणारी एक मुलगी त्याच परिसरातील क्लासला दररोज जात असते. मंगळवारी पहाटे सहा वाजता ती नेहमीप्रमाणे क्लासला निघाली होती. रस्त्यावर अंधार होता. श्री हॉस्पिटल परिसरातून जात असताना अचानक एक संशयित दुचाकीवरून तेथे आला. त्याने तोंडाला रूमाल बांधलेला होता. त्याने मुलीजवळ गाडी थांबवून तिला अडवले.

मुलीने प्रतिकार करताच संशयिताने दुचाकीवरून उतरत तिला धक्का देऊन रस्त्यावर खाली पाडले. जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मुलीने ताकदीने प्रतिकार करत त्याच्या तावडीतून सुटका करून घेत आरडाओरडा सुरू केला. तिचा आरडाओरडा सुरू झाल्यावर संशयिताने तेथून दुचाकीवरून पळ काढला. त्या मुलीने संशयिताचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र तो सुसाट वेगाने पसार झाला.

Related posts: