|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » स्वराज्य उद्योग समूहाच्या हळदी-कुंकू समारंभास प्रतिसाद

स्वराज्य उद्योग समूहाच्या हळदी-कुंकू समारंभास प्रतिसाद 

शहर प्रतिनिधी/ फलटण

मकरसंक्रतीच्या पार्श्वभूमीवर सीतामाई डोंगरावर महिलांना जाता यावे म्हणुन स्वराज उद्योग समुहामार्फत हळदी-कुंकू कार्यक्रम व सीतामाई दर्शन सोहळा मोठय़ा जनसमुदायाच्या उपस्थितीत लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर साखर कारखाना उपळवे (ता. फलटण) येथे पार पडला. सुमारे 50 हजाराहून अधिक महिलांनी उपस्थिती लावल्याने कारखाना परिसरात गर्दीचा महापुरच दिसत होता.

फलटण तालुक्यातून सीतामाई डोंगरावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने माण किंवा खटाव तालुक्यातून वळसा घालून जावे लागत असे. अनेकांना दर्शन घेता येत नसे या पार्श्वभूमीवर माजी खासदार हिंदूराव नाईक-निंबाळकर यांनी सीतामाई घाट रस्त्याचे काम मंजूर करून घेतले घाट फोडुन रस्ता करण्यात आला. सध्या रस्त्याचे काम सुरू असून तालुक्यातील प्रत्येक महिलेला सीतामाई डोंगरावर नेण्याचा संकल्प स्वराज उद्योग समुहाचे चेअरमन रणजितसिंह नाईक निंबाळकर, पं.स.सदस्या ऍड जिजामाला नाईक निंबाळकर यांनी केला.

सीतामाई डेंगराच्या पायथ्याशी असलेल्या लोकनेते कारखान्यावर मकरसंक्रातीदिवशी हळदी कुंकू समारंभ व सीतामाई दर्शन असे आयोजन होते. प्रत्येक गावातून मोफत वाहनांची सोय करून महिलांना सीतामाई दर्शन करण्यात आले तालुक्यातील 50 हजाराहून अधिक महिलांनी यावेळी कारखाना स्थळावर उपस्थिती दर्शविली सीतामाई  डोंगरावर मुंग्यासारखी रांग दिसून आली.

यावेळी उपळवे गावाला जणू यात्रेचे स्वरूप आले होते कारखान्यातून साखर निर्मिती कशी होते कारखाना कसा चालतो याची माहितीही देण्यात आली.

यावेळी उपस्थिती महिलांना नाष्टय़ाची तसेच कारखान्यामार्फत प्रत्येक महिलेला एक किलो साखर वाण देण्यात आली. उपस्थिती महिलांनी या कार्यक्रमाचे कौतुक करून आयोजकांचे आभार मानले. सर्व महिलांचे स्वागत कारखानास्थळी ऍड. जिजामाला नाईक निंबाळकर, मनीषा नाईक निंबाळकर, जयश्री आगवणे यांनी केले.

 

Related posts: