|Sunday, November 17, 2019
You are here: Home » Top News » पवार, साक्षी, सिंधु आणि पिचाई ‘पद्म’ पुरस्काराचे मानकरी ?

पवार, साक्षी, सिंधु आणि पिचाई ‘पद्म’ पुरस्काराचे मानकरी ? 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशातील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱया ‘पद्म’ पुरस्कारांच्या यादीतील संभाव्य नावांची चर्चा सुरू झाली असून त्यामध्ये ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधू, साक्षी मलिक, गुगलचे सुंदर पिचाई, मायक्रासॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला तसेच पॅरालिम्किपटू दीपा मलिक यांची नावे आघाडीवर असल्याचे समोर येत आहे.

एका वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले असून त्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्या नावाचाही समावेश असल्याचे समजते. 1730 नामांकनामधून सरकारने 150 मान्यवरांची नावे शॉर्टलिस्ट केली आहेत. ‘प्रजासत्ताक दिना’च्या पूर्वसंध्येला पुरस्काराने गौरवण्यात येणाऱया व्यक्तींच्या नावांची घोषणा करण्यात येईल. तर मनोरंजन क्षेत्रातून ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर, अभिनेत्री आशा परेख, अभिनेता मनोज बाजपेयी, गायक – संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन, सोनू निगम, कैलाश खरे यांच्या नावाचाही समावेश असल्याचे समजते.

Related posts: