|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » जिल्हाधिकारी कार्यालयातील रक्षकाला खून प्रकरणी अटक

जिल्हाधिकारी कार्यालयातील रक्षकाला खून प्रकरणी अटक 

प्रतिनिधी /मडगाव :

गुळे – काणकोण येथील सुलक्षा गावकर हिच्या खून प्रकरणासंबंधी पोलिसांनी खुनी आरोपी साईनाथ सावंत (26) याला अटक करण्यात आली असून 7 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

 दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षक म्हणून नव्यानेच ताबा घेतलेल्या श्रीमती चंदन चौधरी यांनी काल गुरुवारी सायंकाळी पत्रकारांना ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत मडगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक दिनराज गोवेकर, मडगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील तसेच कुंकळ्ळी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर उपस्थित होते. खुनाचे हे गुढ उकलण्यात हे तीन पोलीस अधीकारी जबाबदार असल्याची माहिती श्रीमती चौधरी यांनी दिली.

पोलीस अधीकारी चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार सुलक्षा गावकर हिच्या खुनाची ही घटना 15/16 जानेवारीच्या मध्यरात्री घडली. मंगळवारी 17 जानेवारी रोजी सकाळी कुंकळ्ळीतील डोंगराजवळील झाडात एका युवतीचा मृतदेह  गावातील एका महिलेला दिसला तेव्हा तिने ही माहिती घरातील इतरांना सांगितले. घरातील एका व्यक्तीने ही बाब पोलिसांच्या कानावर घातली आणि पोलीस यंत्रणा कामाला लागली.

मोबाईल सापडला आणि….

घटनास्थळी पोलीस पोहोचले तेव्हा अंगावर चुडीदार परिधान केलेली एक युवती मृतावस्थेत पडलेली असल्याचे पोलिसांना आढळून आले. पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि शवचिकीत्सेसाठी पाठविण्यात आला. या चिकित्सेवेळी तिच्या अंगावर जखम आढळल्या.

मयताचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला होता तेथे मयताचा मोबाईल पोलिसांना सापडला. या मोबाईलवर असलेल्या शेवटच्या दोन क्रमांकावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. त्या दोन क्रमांकापैकी एक क्रमांक मडगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रक्षक म्हणून काम करणाऱया आंबेली – केपे येथील साईनाथ सावंत यांचा होता.