|Monday, September 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आरोपीच्या बदल्यात भावाने भोगली 10 वर्षांची शिक्षा

आरोपीच्या बदल्यात भावाने भोगली 10 वर्षांची शिक्षा 

हातांचे ठसे तपासल्यानंतर झाली सुटका

वृत्तसंस्था /  बिजनौर

हत्येच्या एका प्रकरणात पोलिसांनी आरोपीच्या जागी त्याच्या भावाला न्यायालयासमोर हजर केले. बाला सिंग नावाच्या या व्यक्तीने 10 वर्षांची शिक्षा देखील भोगली. नंतर जेव्हा हातांचे ठसे तपासून पाहण्यात आले, तेव्हा शिक्षा भोगणारा व्यक्ती आरोपी नसल्याचे उघड झाले. मी आरोपी नाही हे सिद्ध करण्यासाठी माझ्याजवळ कोणताही सरकारी दस्तऐवज नव्हता असे तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर बालाने बोलताना सांगितले.

तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर बाला सिंग यांचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते. अखेर मला न्याय मिळाला, परंतु मी माझा मौल्यवान वेळ गमाविला. 10 वर्षांपूर्वी मी अपेक्षेने पूर्ण असणारा व्यक्ती होतो, परंतु आता माझे वय झाले आहे, माझी सर्व स्वप्ने कोमेजून गेली आहेत. मी निर्दोष होतो आणि मी तुरुंगात एवढी वर्षे काढणे माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक होते. एकवेळ तर मी आशाच सोडली होती.  आता माझी एकच इच्छा आहे. ज्या अधिकाऱयाने मला अटक केली, त्याला शिक्षा मिळावी अशी इच्छा असल्याने त्याने म्हटले.

2001 साली साबूदाला गावात धरमपाल या व्यक्तीच्या हत्येच्या आरोपाप्रकरणी पोलिसांना 4 जणांचा शोध होता. पोलिसांनी 3 जणांना अटक केली, परंतु एक आरोपी पप्पू पसार झाला. न्यायालयाने सुस्ती आणि खराब तपासाची टिप्पणी करत पोलिसांना फटकारले, यानंतर पोलिसांनी 30 एप्रिल 2006 ला पप्पूचा भाऊ बाला याला आरोपी म्हणून हजर केले, ज्यानंतर तो आतापर्यंत शिक्षा भोगत राहिला.