|Sunday, December 15, 2019
You are here: Home » उद्योग » नोटाबंदी निर्णयाचा रोजगार आणि लघुद्योगाला फटका

नोटाबंदी निर्णयाचा रोजगार आणि लघुद्योगाला फटका 

असोचॅमचा अहवाल  ग्रामीण भागात नेमका कसा परिणाम झाला याचा अंदाज लावणे कठीण असल्याचा निष्कर्ष

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्याने त्याचा नकारात्मक परिणाम रोजगारनिर्मिती, लहान आणि मध्यम उपक्रम, ग्रामीण जीवनावर दिसून आला आहे. हा परिणाम अल्पकाळासाठी असला तरी भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा दीर्घकालीन परिणाम दिसून येणार आहे, असे असोचॅम या उद्योग क्षेत्राच्या संघटनेने अहवालात म्हटले आहे.

चलनातील उच्च मूल्याच्या नोटा बदली करण्यात आल्याने 81.5 टक्के लघुद्योगावर त्याचा नकारात्मक परिणाम दिसून आला आणि पुढील एका तिमाहीपर्यंत हा कायम राहणार आहे. मात्र याच संख्येत मोठय़ा उद्योगांना त्याचा दीर्घकाळासाठी सकारात्मक परिणाम दिसून येईल. असोचॅमच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 66 टक्के लोकांनी नोटाबंदीचा नकारात्मक परिणाम गुंतवणुकीवर दिसून आला. ग्रामीण भागामध्ये मोठय़ा प्रमाणात मागणीत घट झाली. सध्या चालू असणाऱया आर्थिक वर्षाच्या शेवटच्याही तिमाहीत विक्रीमध्ये घट झाल्याचे दिसून येईल. जानेवारी-मार्च तिमाहीदरम्यान ग्रामीण भागातील मागणी प्रमाणापेक्षा कमी राहील. चलनी नोटा उपलब्ध नसल्याने भाज्या आणि अन्य धान्याच्या विक्रीमध्ये परिणाम दिसून आला. महागाईवर नोटाबंदीचा सकारात्मक परिणाम झाला आहे, असे 92 टक्के लोकांनी अहवालात म्हटले आहे. असोचॅम आणि बिझकॉन यांच्या संयुक्तपणे हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

अर्थव्यवस्थेमध्ये मोठय़ा प्रमाणात उलथापालथ होत असताना तळागाळातील स्थितीचा अंदाज लावणे हे कठीण असते. मात्र नोटाबंदीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर चांगला अथवा वाईट परिणाम होईल हे सांगणे सध्या कठीण आहे. सध्या नोटाबंदीचा काही क्षेत्रांवर परिमाण दिसत आहे, तर काही क्षेत्रे त्यापासून पूर्णतः बाहेर आहेत, असे असोचॅमचे महासचिव डी. एस. रावत यांनी म्हटले. नोटाबंदीने कृषी, सिमेंट, खते, आटोमोबाईल, वस्त्रोद्योग, रियल इस्टेट आणि रिटेल क्षेत्रांवर नकारात्मक, तर ऊर्जा, ऑईल ऍन्ड गॅस, फार्मा, इन्फ्रास्ट्रक्चर, आयटी आणि इलेक्ट्रॉनिक या क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम दिसून आल्याचे म्हटले आहे. नोटाबंदीचे भविष्यकाळात चांगले परिणाम दिसून येतील, असाही विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Related posts: