|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जालन्यातील अपघातातून सिंधुताई सपकाळ बचावल्या

जालन्यातील अपघातातून सिंधुताई सपकाळ बचावल्या 

औरंगाबाद / प्रतिनिधी

सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या वाहनाला जालना जिल्हय़ातील बदनापूर तालुक्यामधील खादगाव शिवारात सोमवारी पहाटेच्या सुमारास अपघात झाला. सुदैवाने सिंधुताई यातून सुखरूप बचावल्या. मात्र, या अपघातात सिंधुताई यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले.

सिंधुताई सपकाळ एका कार्यक्रमानिमित्त रविवारी रात्री मुलगा विनयसह पुण्यातून वर्ध्याकडे वाहनाने जात होत्या. पहाटेच्या सुमारास त्यांचे वाहन दुभाजकाला धडकल्याने अपघात झाला. सुदैवाने यातून सिंधुताई यांच्यासह त्यांचा मुलगा आणि चालक बचावले. दरम्यान, अपघाताची माहिती कळताच अपर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहनांमधील तिघांचीही वैद्यकीय तपासणी केली. त्यांना कसलीही गंभीर दुखापत झाली नसल्याची खात्री पटल्यानंतर दुसऱया वाहनातून त्यांना वर्ध्याकडे रवाना करण्यात आले.