|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ‘ऑन्को’मध्ये 15 महिन्यात 2055 रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

‘ऑन्को’मध्ये 15 महिन्यात 2055 रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया 

विजय जाधव / गोडोली

जीवन अनमोल असून शरीराची काळजी घेणे ही सर्वस्वी स्वतःची जबाबदारी आहे. तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्यामुळे तोंडाचा पॅन्सर होऊ शकतो. पॅन्सरची लक्षणे ओळखता आली पाहिजे. वेळेत योग्य निदान, तज्ञांच्याकडून औषधोपचार आवश्यकतेनुसार शस्त्रक्रियेनंतर अन्य उपचार पद्धती पॅन्सर आजार बरा करण्यासाठी उपयुक्त ठरते. मनातील पॅन्सर आधी बरा झाला तर पुढे शरीरातील तो बरा होण्यास मदत होते असे निष्णांत पॅन्सर उपचार तज्ञ डॉ. मनोज लोखंडे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केले. दरम्यान, ऑन्को सेंटरमध्ये 15 महिन्यात तब्बल 2055 रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

दि. 23 जानेवारी हा मौखिक आरोग्य दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. सातारा जिह्यातील पॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी सर्वोउपचार केंद्र असलेल्या शेंद्रे येथील ऑन्को लाईफ पॅन्सर सेंटरचे शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. मनोज लोखंडे, डॉ. कुणाल मांगले, डॉ. विकास पाटील, संचालक उदय देशमुख यांच्याशी या दिनाचे औचित्य साधून बातचित करण्यात आली. त्यावेळी ऑन्को सेंटरमध्ये तोंड, घसा, फुफ्फुस, स्तन, गर्भाशय, आतडय़ाचा, किडणी व मुत्राशयाचा पॅन्सर आजार असलेल्या रुग्णांवर उपचार होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

शेंद्रे येथे ऑन्को सेंटरची 1 ऑगस्ट 2015 पासून सुरुवात तर 1 मार्च 2016 पासून उपचार घेणाऱया रुग्णांना पिवळे किंवा केसरी रेशनकार्ड असणाऱया रुग्णांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत उपचारासाठी आर्थिक मदत उपलब्ध करुन दिली जाते. मात्र लवकर योग्य निदान, निदान न करता अवैद्यकिय उपचार, उपचाराबाबत परिपूर्ण ज्ञान नसणाऱया डॉक्टरांकडून उपचार करुन घेत वेळ वाया गेल्यामुळे अनेक रुग्णांचा आजार बळावतो. गंभीर अवस्थेत रुग्ण या सेंटरमध्ये दाखल झाल्यावर शस्त्रक्रिया करणे हा एकमेव पर्याय राहतो. यात तोंडातील गाल, जीभ, ओठ अशा अवयवांचा पॅन्सर झाल्यास तो अवयव काढून टाकावा लागतो. अवयवाचे महत्त्व तो निकामी झाल्यावर समजते, असे मत डॉ. कुणाल मांगले यांनी सांगितले.

ऑन्को सेंटरचे संचालक उदय देशमुख यांनी सांगितले, ऑन्को सेंटरमध्ये 15 महिन्यात तब्बल 2055 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. शेकडो रुग्णांनी औषधोपचाराचा लाभ घेतला आहे. पॅन्सरमुक्त समाज निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रत्येकानेच व्यसनमुक्त राहून पॅन्सरमुक्त समाज निर्मिती करण्यासाठी आपले योगदान देण्याचा ‘मौखिक आरोग्य दिन’ संकल्प करावा असे आवाहन केले.

पॅन्सर आजार असणाऱया रुग्णांवर अनेक भोंदूबाबा, दैवी उपचार केले जातात. तर काही अपुरे ज्ञान असणारे वैद्यकिय क्षेत्रातील काही जणे औषधोपचार करतात. यातून रुग्णाचा आजार बरा न होता तो अधिक बळावतो. गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यावर पॅन्सर सेंटरवर रुग्णांना पाठवले जाते. जर प्राथमिक अवस्थेत पॅन्सरची लक्षणे दिसून आल्यास अशा रुग्णांना ऑन्को सेंटरमध्ये पाठवल्यास त्याचा आजार प्राथमिक अवस्थेतच बरा करणे शक्य होते. ज्यांना परिपूर्ण ज्ञान नाही, अशा भोंदूबाबा, दैवी उपचार, डॉक्टर यांनी पॅन्सर आजार असणाऱया रुग्णांवर उपचार करु नयेत. असे उपचार म्हणजेच रुग्णांच्या जीवाशी खेळ असते. ऑन्को सेंटरमध्ये विविध आरोग्य विमा योजना व केशरी व पिवळे रेशनकार्ड धारकांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत उपचार केले जातात, अशी माहिती शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. विकास पाटील यांनी सांगितली.