|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » Top News » एसटी 20 फूट खड्डय़ात कोसळली ; 25 प्रवासी जखमी

एसटी 20 फूट खड्डय़ात कोसळली ; 25 प्रवासी जखमी 

ऑनलाईन टीम / लोणावळा :

एसटी महामंडळाची बस बोरिवलीहून सातारा येथे जात असताना किवळे एक्झिट येथे 20 फूट खोल खड्डय़ात कोसळली. या अपघातात 25 प्रवाशी जखमी झाले आहेत.

महाराष्ट्र परिवहन महामंडळाची बस बोरिवलीहून सातारा येथे निघाली होती. किवळे एक्झिट येथे बसचा पुढचा टायर पंक्चर झाला. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ही बस सुमारे 20 फूट खोल खड्डय़ात कोसळली. हा अपघात सकाळी साडेदहाच्या सुमारास झाला. या बसमध्ये 35 प्रवासी होते. यातील 25 प्रवासी जखमी झाले असून पाच प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. आर्यन देवदूत आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

Related posts: