|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अबकारी खात्याचा मद्यालयांना दणका

अबकारी खात्याचा मद्यालयांना दणका 

प्रतिनिधी/ पणजी

निवडणुकीची धुमाळी सुरु झाली असून मतदारांना भुलविण्यासाठी उमेदवारांकडून मद्याचा वापरही होण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टीवर आळा बसावा म्हणून निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू झाल्यापासून मद्य विक्रेत्यांना काही नियम घालुन दिले आहेत. या नियमांचे पालन न करणाऱया मद्य विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मद्यविक्री व निर्मितीच्या ठिकाणी सीसीटीव्ही पॅमेरे बसविणे सक्तीचे आहे. मद्यविक्री दुकाने रात्री 9 वा. तर बार रात्री 11 वा. बंद करायला हवेत. मद्य विक्रेत्यांनी दैनंदिन हिशेब अबकारी खात्याकडे सादर करणे आवश्यक आहे. आतापर्यंत नियमभंग केल्याबद्दल 62 घाऊक मद्य विक्रेते, 10 डिस्टिलरी आणि वायनरी तसेच 5 देशी दारुचे बॉटलिंग करणारी आस्थापने मिळून 77 जणांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, अशी माहिती अबकारी सहाय्यक आयुक्त सत्यवान भिवशेट यांनी दिली.  

रात्री 11 नंतर डान्स सुरु ठेवल्याने परवाना निलंबित

हणजूण येथील शिवा व्हेली या बारमध्ये 17 जानेवारी रोजी रात्री 11 नंतर डान्स सुरु असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. पोलिसांनी त्याचे व्हिडीओ चित्रण करून जिल्हाधिकाऱयांना सादर केले. त्यानंतर सदर बारवर कारवाई करून परवाना निलंबित करण्यात आला. त्यामुळे एकूण निलंबित बारची संख्या 78 झाली आहे.

सिमेवरील चेकपोस्टवर सीसीटीव्ही पॅमेरे

दरम्यान, आचारसंहितेच्या काळात राज्यात एकूण 80 भरारी पथके कार्यरत आहेत. अखंड 24 तास ही पथके देखरेख करीत आहेत. प्रत्येक तालुक्यात एक कंट्रोलरुम असून, तेथे फोनद्वारे आलेल्या तक्रारीचींही त्वरित दखल घेतली जात आहे. राज्यातील सर्व सिमेवर अबकारी खात्याचे अधिकारी देखरेख ठेवत असून, सिमेवरील चेकपोस्टवरही सीसीटीव्ही पॅमेरे लावण्यात आले आहेत. एकूणच अबकारी खात्याने कडक धोरण अवलंबले असून त्वरित कारवाई केली जात असल्याचे दिसून येत आहे.

Related posts: