|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित घ्या : राष्ट्रपती

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित घ्या : राष्ट्रपती 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जर देशातील सर्व राजकीय पक्ष आणि निवडणूक आयोगाने एकत्रित येऊन लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित घेतली तर हे सहज शक्य आहे. यामुळे निवडणूक आयोग आणि राजकीय पक्ष यांचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचेल, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले.

भारतीय निवडणुकीबाबतच्या ‘अनफोल्डिंग इंडियन इलेक्शन जर्नी ऑफ द लिव्हिंग डेमोपेसी या कॉफी टेबल बुक’च्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, निवडणूक आयोग ही एक स्वायक्त संस्था असून, तिला अजून सक्षम केले पाहिजे, भारत हा जगातील सर्वात मोठय़ा लोकशाही असलेला देश आहे, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, असेही ते म्हणाले.