|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » निवडून आलेले आमदारच आपला नेता निवडतील

निवडून आलेले आमदारच आपला नेता निवडतील 

प्रतिनिधी/ पणजी

कोंग्रेस पक्षाचे नेते प्रतापसिंग राणे व लुईझिन फलेरो यांनी अमित शहा यांच्या गरज भासल्यास केंद्रातून मुख्यमंत्री पाठवू या विधानावर टिका करत गोवा हे केंद्र साशीत प्रदेश नाही असे म्हटले होते. पण मी राणे यांना सांगू इच्छीतो की भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रीय पार्टी आहे. गोव्यात भारतीय जनता पार्टीने मोठया प्रमाणात विकास केला आहे. तसेच लोकांसाठी विविध नवीन योजनाही अस्तित्वात आणले आहे. जे कोंग्रेस सरकारला गेली कित्येक वर्षे जमलेले नाही असे साखळीचे आमदार प्रमोद सावंत यांनी सांगितले.

पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपच्या प्रचार गाण्यांचा शुभारंभही करण्यात आला. यामध्ये एकुण 5 गाण्यांचा समावेश आहे. तसेच कोंग्रेसच्या जाहीरनाम्यावर टिका सावंत यांनी यावेळी केली. 

 कोंग्रेसने जो जाहीरनामा तयार केला आहे तो अत्यंत फसवेगीरीचा जाहीरनामा आहे.  विद्यार्थ्यांना मोफत पेट्रोल देण्यात येईल असे त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात नमूद केले आहे, पण ते एवढे पैसे आणणार कुठून असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच अर्थ नसलेल्या या जाहीरनाम्याव्दारे गोमंतकीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कोंग्रेस करत आहे. पण याला कुठलाही गोवेकर बळी पडणार नाही. कारण भाजपचे नेतृत्व खंबीर असून आम्ही गोवेकरांना स्थिर सरकार दिले आहे. यावेळीही अमाचेच सरकार पूर्ण बहूमताने सत्तेवर येणार व निवडून आलेले आमदारच आपला नेता ठरवतील असे सावंत यांनी पूढे सांगितले.

 

Related posts: