|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » भाजपचा मुंबईत मेळावा ; मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची उत्सुकता

भाजपचा मुंबईत मेळावा ; मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची उत्सुकता 

ऑनलाईन टीम / मुंबई :

शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर आता भाजपही याला प्रत्युतर देण्यासाठी सज्ज झाला आहे. भाजपचा आज मुंबईतील गोरेगावात मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विजय संकल्प मेळावा होणार आहे. त्यामुळे सगळय़ांना मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची उत्सुकता लागली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या मेळाव्यात राज्यातील अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित राहतील. उध्दव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्र्यासह भाजप नेते काय प्रत्युतर देतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

‘राज्यातील सर्व महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका यापुढे स्वबळावर लढणार’ अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी केली होती. गोरेगावच्या पदाधिकारी मेळाव्यात हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये आणि जयघोषामध्ये ही घेषणा करण्यात आली त्यामुळे मुंबईसह 10 महापालिकांच्या निवडणुकीत शिवसेना विरूध्द भाजप असा संघर्ष रंगणार आहे.

Related posts: