|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » व्यवसाय आणि सेवा यातील तारतम्य डॉक्टरांनी सांभाळावे

व्यवसाय आणि सेवा यातील तारतम्य डॉक्टरांनी सांभाळावे 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

ँवैद्यकीय सेवा असा शब्दप्रयोग पूर्वी समाजात रुढ होता. कालांतराने त्याला वैद्यकीय व्यवसाय असे म्हटले जावू लागले. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील विश्वास जपला पाहिजे. यासाठी डॉक्टरांनी व्यवसाय आणि सेवा यातील तारतम्य बाळगणे  आवश्यक आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. त्यांच्या हस्ते शुक्रवारी महाराणा प्रताप चौकातील केपीसी हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले.

महाराणा प्रताप चौकातील प्रभू हॉस्पिटलच्या ठिकाणी केपीसी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल सुरुक् करण्यात आले आहे. डॉ. नितीन केसरकर, आशिष पाटील आणि विशाल चौगुले यांनी हे हॉस्पिटल सुरू केले आहे. या हॉस्पिटलमध्ये डॉ.प्रशांत पाटील, डॉ. उदय मिरजे यांच्यासह अन्य तज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत. शुक्रवारी शरद पवार यांच्या हस्ते हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापौर हसिना फरास, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, जयंत पाटील, संध्यादेवी कुपेकर, सुरेश हाळवणकर, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार के.पी.पाटील, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमूख संजय मंडलीक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर.के.पोवार, शहराध्यक्ष राजेश लाटकर, स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास, डॉ.संतोष प्रभू हे उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील म्हणाले, ‘आघाडी सरकारच्या काळात राजीव गांधी जीवनदायी योजनेसारख्या चांगल्या योजना सुरू केल्या. या योजनांचा अनेक रुग्णांना फायदा झाला. मात्र आता या योजनेअंतर्गत रुग्णालयांना ]िबलाचे पैसे सरकारकडून वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णालये या योजनेअंतर्गत उपचार करण्यास टाळाटाळ करतात. हा प्रश्न विधानसभेत मांडणे आवश्यक आहे.’ त्यानंतर मुश्रीफ, सतेज पाटील, धनंजय महाडिक, के.पी.पाटील, सुरेश हाळवणकर यांनी मनोगते व्यक्त केली.

या प्रसंगी शरद पवार म्हणाले, ‘पूर्वी वैद्यकीय सेवा हा शब्द रुढ होता. त्यानंतर वैद्यकीय व्यवसाय असे म्हणू लागले. सेवा आणि व्यवसाय याचे तारतम्य डॉक्टरांनी बाळगले पाहीजे. पूर्वी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये विश्वासाचे नाते होते. त्यातूनच पॅमिली डॉक्टर ही संकल्पना समोर आली. हे पॅमिली डॉक्टर नुसते भेटले तरी रुग्णाला बरे वाटत होते. रुग्णाचे नाडी परिक्षण करून डॉक्टर आजाराचे निदान सांगायचे. त्यातूनच परस्परांवर विश्वास निर्माण व्हायचा. मला वारंवार रुग्णालयात जावे लागते. कधी पायात रॉड बसवायला, कधी पॅन्सरच्या उपचारासाठी. पण माझे दोनच डॉक्टर आहेत आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. हा रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये हा विश्वास निर्माण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने केपीसी मधील डॉक्टर प्रयत्नशील राहतील अशी आशा आहे.’

वसंतदादांची दूरदृष्टीमुळेच मेडिकल हब

एकेकाळी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी किंवा चांगल्या उपचारांसाठी महाराष्ट्रातील लोकांना कर्नाटकात जावे लागत होते. पण वसंतदादांनी खासगी रुग्णालये, शिक्षण संस्था यांच्या उभारणीसाठीचे धोरण आखल्याने सांगली, कोल्हापूर येथे मेडिकल हब निर्माण झाले आहे. डॉ.डी.वाय.पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांचे योगदानही मोठे आहे. असे शरद पवार म्हणाले.

आमच्यापासून लांब रहा

राजकारणी लोक आणि वैद्यकीय व्यवसाय यावर कोपरखळी मारताना पवार म्हणाले, ‘व्यासपीठावर सर्व राजकारणी मंडळी आहेत. कार्यकर्ता आणि गरजू व्यक्ती उपचाराची मागणी करत आल्या की आम्हीला डॉक्टरांना फोन करावा लागतो. मग डॉक्टरांचे बँकेचे मिटर बिघडते. आधीच त्यांनी भांडवली गुंतवणूक बरीच केलेली असते. त्यामुळे चांगला वैद्यकीय व्यवसाय करायचा असेल तर आमच्या सारख्या राजकाण्यांपासून लांब रहा. सतेज पाटील यांचीही सर्वत्र हॉस्पिटल्स आहेत. त्यांनी ही खबरदारी घेतलेली आहे.’

सतेज पाटीलांनीही केली सर्जरी

महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील वादावर चिमटा काढत पवार म्हणाले, ‘राजकारणी चांगले सर्जन असतात. त्यांनी केलेली सर्जरी पटकन लक्षात येत नाही मात्र नंतर कळते बरीच गडबड झाली आहे. सतेज पाटील यांनीही एका आजाराचे चिंतन केल. उपाय शोधला आणि यशस्वी सर्जरी केली.’

महाडिकांचे मार्गदर्शन घ्या

हसन मुश्रीफ आणि संजय मंडलीक यांच्याकडे हात करून पवार म्हणाले, ‘दोघांनीही तब्येत सांभाळणे गरजेचे आहे. तुम्ही महाडिकांकडून मार्गदर्शन घ्या. त्यांनी त्यांची तब्येत व्यवस्थीत सांभाळली आहे. हे विधान पवारांनी जि.प.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केल्याची चर्चा राजकीय कार्यकर्त्यांच्यात रंगली होती.’

 

पद्मविभूषण मिळाल्याने पवारांचा सत्कार

शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी पासवर्ड सूत्रसंचालनाचा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 

Related posts: