|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » इंग्रजीचे अनुदान टप्प्याटप्प्याने बंद करु

इंग्रजीचे अनुदान टप्प्याटप्प्याने बंद करु 

प्रतिनिधी / पणजी

गोवा सुरक्षामंच पार्टी, मगो पार्टी आणि शिवसेनेने आपला जाहीरनामा प्रकाशित केला. विविध योजनांचा जाहीरनाम्यात समावेश केलेल्या गोवा सुरक्षामंच आणि शिवसेनेने इंग्रजीचे अनुदान टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे आश्वासन दिले आहे. तर मगोने सत्तेवर आल्यास डिझेल 2 रुपयांनी स्वस्त करण्याचे आश्वासन दिले आहे.

गोवा सुरक्षामंच शिवसेनेने कॅसिनोला विरोध केला आहे. तर कुळ कायद्यातील दुरुस्ती मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे. डान्सम्युझिक पाटर्य़ा व रेव्ह पाटर्य़ांनाही विरोध दर्शविला आहे. शनिवारी घेतलेल्या दोन वेगवेगळ्या पत्रकार परिषदामध्ये हे जाहीरनामे प्रकाशित करण्यात आले. गोवा सुरक्षामंच पार्टीचा जाहीरनामा अरविंद भाटीकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला विवेकानंदाच्या विचारांना समोर ठेऊन हा जाहीरनामा तयार केल्याचे यावेळी अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी सांगितले.

महिला व युवा मतदारावर भर

गोवा सुरक्षामंचने आपल्या जाहीरनाम्यात महिला व युवा मतदाराना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. विकासावर भर दिला आहे. त्याचबरोबर स्वाभीमानी समाज घडविण्यावर भर दिला असल्याचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी सांगितले. गोव्यातील तरुणाना आत्मनिर्भर करण्याचा उपक्रम जाहीरनाम्यात आहे. भाजपने महिल व युवकांना लाचार बनवून सत्ता अबाधित ठेवली. भाजपने पैशाचे वाटप केले. पण दुसऱया बाजूने कर्जाचे डोंगर उभे केले. भाजपने आपल्या जाहीरनाम्याची पूर्तता केली नाही. जनतेसमोर जाऊन भाजपने सांगावे त्यानी किती आश्वासने पूर्ण केली. यावेळी उपस्थित असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही भाजपवर जोरदार टीका केली. गोव्याचे राजकारण देशाला राजकारणाला कलाटणी देणारे असेल व निकाल धक्कादायक असेल असेही ते म्हणाले. यावेळी अरविंद भाटीकर, जीवन कामत, शिवप्रसाद जोशी, किरण नायक यांची उपस्थिती होती.

कुळ मुंडकार कायदा सुटसुटीत करणार

मगो पक्षाचे सरकार सत्तेवर येताच कुळ मुंडकार कायद्यात दुरुस्ती करण्याचे आश्वासन मगोने आपल्या जाहीरनाम्यातून दिले आहे. मामलेदार कचेरीत खास कुळ मुंडकार न्यायालयाची स्थापना करुन सनद घरपोच दिली जाईल. कृषी क्षेत्रावर मगोने मोठय़ा प्रमाणात भर दिला आहे. अमली पदार्थविरोधी कडक कायदा करण्याचे आश्वासन दिले आहे. शैक्षणिक हब म्हणून गोव्याचा विकास करण्यावर भर दिला जाणार आहे. राज्यातील धनगर समाजासाठी खास योजना तसेच डिझेलचे दर 2 रुपये प्रतिलिटर कमी करण्याचे आश्वासन दिले आहे.

Related posts: