|Sunday, November 17, 2019
You are here: Home » Top News » खासदार नाना पटोले यांना अर्धांगवायूचा झटका ; प्रकृती स्थिर

खासदार नाना पटोले यांना अर्धांगवायूचा झटका ; प्रकृती स्थिर 

ऑनलाईन टीम / नागपूर :

भंडारा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार नाना पटोले यांना नागपूरातील एका कार्यक्रमात अर्धांगवायूचा झटका आला. त्यानंतर त्यांना लगेचच नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

नागपूरातील एका जलतरण स्पर्धेच्या उद्घाटनासाठी पटोले आले होते. त्यावेळी भरकार्यक्रमातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यातच त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यांना त्वरीत जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Related posts: