|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » पाचवी पास धर्मपाल घेतात वर्षाला तब्बल 21 कोटींचा पगार

पाचवी पास धर्मपाल घेतात वर्षाला तब्बल 21 कोटींचा पगार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

शिक्षणाशिवाय जगात काय सिद्ध करता येतं का, असा प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर नक्कीच हो असेल. कारण केवळ पाचवी पास असलेले 94 वर्षीय धर्मपाल गुलाटी यांनी मोठी जिद्द आणि प्रचंड मेहनतीच्या जीवावर हे साध्य केले. त्यामुळे ते वर्षाला तब्बल 21 कोटी रुपयांचा पगार घेत आहेत.

gulati

धर्मवीर यांना आपण ‘एमडीएच’ मसाल्याच्या पॅकेटवर अनेकदा पाहिले असेल. त्यांचे शिक्षण इतके कमी असूनही ते कष्टाच्या जीवावर त्यांनी हे सिद्ध केले. इतका पगार घेत गोदरेज आणि विवेक गंभीर, हिंदुस्तान युनिलिव्हरचे संजीव मेहता आणि आय. टी. सी.चे वाय. सी. देवेश्वर यांना धर्मपाल यांनी मागे टाकले आहे. धर्मपाल यांची ‘महाशिया दी हट्टी’ हे एम. डी. एच.चे उत्पादन सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्यामुळे या उत्पादनातून वर्षाला 213 कोटी रुपयांचा नफा कंपनीला होतो. यातूनच धर्मपाल यांना 21 कोटी रुपयांचा पगार दिला जात आहे.