|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » युतीचा निरोप घेऊन बाळा नांदगावकर ‘मातोश्री’वर

युतीचा निरोप घेऊन बाळा नांदगावकर ‘मातोश्री’वर 

मुंबई :

 शिवसेनेने भाजपशी युती तोडल्यानंतर सेना आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आला असतानाच रविवारी मनसे नेते बाळा नांदगावकर हे युतीचा निरोप घेऊन मातोश्रीवर गेल्याने आता शिवसेना-मनसे एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नांदगावकर यांनी मनसेकडून युतीच्या संदर्भात शिवसेना खासदार अनिल देसाई, राहुल शेवाळे, आमदार अनिल परब यांच्यासोबत चर्चा केल्याचे समजते. शिवसेना-मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चा असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत:च युतीची शक्यता फेटाळून लावली होती, मात्र आता मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी राज ठाकरे यांचा युतीचा प्रस्ताव घेऊन शिवसेना नेत्यांशी चर्चा केल्याने आता शिवसेना-मनसे एकत्र येण्याच्या चर्चेला दुजोरा मिळण्याची शक्यता आहे. तसेच शेवटी मनसेच्या प्रस्तावावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related posts: