|Thursday, February 20, 2020
You are here: Home » leadingnews » हे अर्थसंकल्पीय अधिवेशन ऐतिहासिक : राष्ट्रपती

हे अर्थसंकल्पीय अधिवेशन ऐतिहासिक : राष्ट्रपती 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

‘सबका साथ, सबका विकास’ हेच आमच्या सरकारचे ध्येय असल्याने गरीबांचे जीवनमान सुधारावे यासाठी आमच्या सरकारने अनेक नव्या योजना आणल्या आहेत, त्यामुळे हे अधिवेशन ऐतिहासिक असल्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितले.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवशेन आजपासून सुरु होत असून या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी संसदेच्या संयुक्त सभागृहापुढे अभिभाषण केले. राष्ट्रपती म्हणाले, गरीबांचे जीवनमान सुधारावे, यासाठी आमच्या सरकारने प्रयत्न केले असून अनेक नव्या योजना आणल्या आहेत. जनशक्तीमुळे स्वच्छ भारत अभियानाचे जन आंदोलनाचे रुपांतर झाले आहे. याचबरोबर 26 कोटी जनधन खाती उघडली गेली. काळ्या पैशांविरोधात लढण्यासाठी नागरिकांनी सरकारला साथ दिली. तसेच विविध सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत 13 कोटी गरीबांना सामावण्यात आले, असल्याचे राष्ट्रपती म्हणाले.

Related posts: