|Sunday, November 17, 2019
You are here: Home » मनोरंजन » सोनम बनली डिजिटल स्टिकर असणारी पहिली भारतीय अभिनेत्री

सोनम बनली डिजिटल स्टिकर असणारी पहिली भारतीय अभिनेत्री 

 ऑनलाईन टीम/मुंबई: 

 अभिनेत्री सोनम कपूर २०१५ मध्ये पृथ्वीच्या संरक्षणार्थ राबवण्यात आलेल्या एका उपक्रमासाठी अँग्री बर्ड बनली होती. त्यामुळे स्टाइल आयकॉन सोनमसाठी ही काही नवीन गोष्ट नाही. पण, सोनम कपूर ही स्वतःचे डिजिटल स्टिकर असणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरल्यामुळे सध्या तिच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. हे डिजिटल स्टिकर सोनमने आतापर्यंत साकारलेल्या विविध भूमिकांच्या रुपात बनवण्यात आले आहेत. असे हे बहुरंगी आणि बहुढंगी डिजिटल स्टिकर लवकरच प्रदर्शित केले जाणार असून सोनमच्याच सिग्नेचर अॅपवर ते उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. सोनम ही पहिली भारतीय अभिनेत्री आहे जिचे स्वतःचे अॅप लॉन्च झाले आहे.

आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच सोनम सोशल मीडियावर जोडलेली असते. ती इन्स्टाग्राम, ट्विटर यांसारखे नेटवर्किंग साइटवर फार सक्रीयही असते. ‘आय हेट लव स्टोरी’, ‘आयशा’, ‘नीरजा’, ‘डॉली की डोली’ आणि ‘खूबसूरत’ या चित्रपटांतील भूमिकांपासून या डिजिटल स्टिकरची प्रेरणा घेण्यात आली आहे.

Related posts: