|Monday, December 9, 2019
You are here: Home » Top News » पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन ; बीएसएफ कॅम्पवर गोळीबार

पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन ; बीएसएफ कॅम्पवर गोळीबार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पाकिस्तानी लष्कराकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या केंद्रावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला बीएसएफच्या जवानांनीही पाकिस्तानी लष्कराला जशाच तसे चोख प्रत्युत्तर दिले.

भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर पकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. जम्मू येथील सांबा सेक्टरमधील बीएसएफच्या कॅम्पवर पाकिस्तानी सैन्याने दुपारी साडेतीनच्या सुमारास तुफान गोळीबार केला. त्यानंतर ग्रेनेडनेही हल्ला करण्यात आला. भारतीय लष्कराने या हल्ल्याला जशाच तसे चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधीचे उल्लंघन ही या वर्षातील पहिलीच घटना आहे.

Related posts: