|Thursday, January 23, 2020
You are here: Home » क्रिडा » पंजाबचा रांची रेसवर मोठा विजय

पंजाबचा रांची रेसवर मोठा विजय 

वृत्तसंस्था /रांची :

कोल इंडिया पुरस्कृत पाचव्या हॉकी इंडिया लीग स्पर्धेतील बुधवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात विद्यमान विजेत्या जेपी पंजाब वॉरियर्सने रांची रेसचा 7-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव करून या स्पर्धेत आपला पहिला विजय नोंदविला.

पंजाब संघातील आघाडी फळीत खेळणाऱया एस.व्ही. सुनीलने 26 व्या आणि 34 व्या मिनिटाला असे दोन मैदानी गोल नोंदविले. 25 व्या मिनिटाला वेर्डेनने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून पंजाबचे खाते उघडले होते. जॅक व्हिटॉनने मैदानी गोल नोंदवून आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. व्हिटॉनचा या स्पर्धेतील हा 43 वा गोल नोंदविला. रांचीच्या या मैदानावर यजमान संघावर पंजाबचा हा पहिला विजय आहे. गेल्या शुक्रवारी या स्पर्धेतील सामन्यात दबंग मुंबईने पंजाब वॉरियर्सचा 10-4 असा पराभव केला होता. या सामन्यात दुखापतीमुळे रांची संघातील जर्मनीचा खेळाडू रूहेर खेळू शकला नाही. बुधवारच्या सामन्यात शेवटच्या 15 मिनिटामध्ये रांचीला दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळाले पण ते वाया गेले. या विजयामुळे पंजाबने स्पर्धेच्या गुणतक्त्यात पाचव्या स्थानावर झेप घेतली. त्यांनी 5 गुण मिळविले असून रांची रेस पाच सामन्यांतून 10 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे. मुंबई दबंगने 17 गुणांसह पहिले तर कलिंगा लान्सर्सने 15 गुणांसह दुसरे तसेच उत्तरप्रदेश विझार्डने 6 गुणांसह चौथे, दिल्लीने 3 गुणांसह सहावे स्थान मिळविले आहे.

Related posts: