|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » Top News » संजय राऊत शिवसेनेचे शकुनी मामा ; संभाजी पाटलांची टीका

संजय राऊत शिवसेनेचे शकुनी मामा ; संभाजी पाटलांची टीका 

ऑनलाईन टीम / उस्मानाबाद :

शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत हे दिल्लीत बसून शरद पवार यांच्या सल्ल्याने शकुनी मामाची भूमिका पार पाडत आहेत, अशी टीका कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली.

उस्मानाबाद येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी पाटील यांनी संजय राऊत आणि शिवसेनेच्या मंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, मंत्रिमंडळाच्या बैठकीत चांगला निर्णय होत असेल तरीही शिवसेनेचे मंत्री यामध्ये अडथळा आणतात. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही परिस्थिती शिवसेना आणि भाजपमध्ये युती हवी होती. मात्र, दिल्लीत काही जण पवारांच्या अवतीभवती बसून राजकारण शिजवतात, असा आरोपही त्यांनी केला.

Related posts: