|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » विज्ञान-कलेचा एकत्रित सन्मान

विज्ञान-कलेचा एकत्रित सन्मान 

विशेष प्रतिनिधी / पु.भा. भावे साहित्य नगरी, डोंबिवली

90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्यात प्रथमच विज्ञान आणि चित्रकलेचा एकत्रित सन्मान करण्याचा योग घडून आला. साहित्यामध्ये विज्ञान कथेला वेगळे दालन खुले करुन देणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर तर आपल्या चित्रकलेने साहित्याची सेवा करणारे ज्येष्ठ चित्रकार बाळ ठाकूर यांचा विशेष सन्मान साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या हस्ते करण्यात शं. ना. नवरे सभामंडपात करण्यात आला. या प्रसंगी बाळ ठाकुर यांनी चित्रप्रवास तर जयंत नारळीकर यांनी आपला लेखन प्रवास उलडून दाखवला.

नियतकालिकामध्ये चित्रकार म्हणून जबाबदारी पार पाडत आलो. साहित्याच्या अनुषंगाने चित्र काढणे आव्हानात्मक राहिले, असे मनोगत बाळ ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले.  तसेच पुढे म्हणाले की, जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेताना मला कोणाचेच मार्गदर्शन लाभले नाही. तरी मी अप्लाय आर्ट प्रवेश घेतला आणि पुढे त्यामध्येच काम केले.

विज्ञान आणि साहित्यामध्ये समान धागा आहे तो उत्कृष्टतेचा. माझ्याबाबतीत वैज्ञानिकांना वाटते की मी साहित्यिक आहे तर साहित्यिकांना मी वैज्ञानिक वाटते. आज विज्ञान साहित्य ही काळाजी गरज आहे. आपल्या भोवताली घडणारे
विज्ञानातील बदल साहित्यातून येणे आवश्यक आहे. विज्ञानाचा समाजावर परिणाम होतो. त्या परिणामाचा वापर करुन विज्ञान कथानक करू शकतो. त्यातून समाजप्रबोधन करता येते, असे मत ज्येष्ठ विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले. तर सिद्धहस्त लेखक, साहित्यिकांनी विज्ञान कथा क्षेत्रात यावे असे आवाहन नारळीकर यांनी याप्रसंगी केले. साहित्य क्षेत्रात मी एम. ए. फॉस्टर यांच्यामुळे आलो, असे सांगत फॉस्टर यांच्यासोबत घालवेल्या केम्ब्रिज विद्यापीठातील अनुभवांचे नारळीकर यांनी कथन केले. 

Related posts: