|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पंढरपूरच्या युवकावर सांगलीत गोळीबार

पंढरपूरच्या युवकावर सांगलीत गोळीबार 

प्रतिनिधा/ सांगली

शहरातील कर्नाळ रोडवरच्या शिवशंभो चौकात शनिवारी दु. साडेअकरा ते 12 च्या सुमारास मूळच्या पंढरपूर येथील अभय उर्फ बबलू सुरवसे या युवकावर गोळीबार झाला. दिवसाढवळय़ा घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली. पोलिसांची धावपळ झाली. याबाबत रात्री उशीरापर्यंत पोलिसात नोंद झाली नसली तरी हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

युवक बबलू सुरवसे हा मूळ पंढरपूर येथील असून तो कर्नाळ रोड, दत्तनगर येथे मामाकडे राहतो. शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास तो मामाचे दुकान बंद करून दुचाकीवरून सांगलीकडे येत होता. शिवशंभो चौकात आला असता त्याला मोबाईलवर फोन आला. गाडी थांबवून बोलत असताना अचानक पाठीमागून दोन दुचाकीवरून सहाजण आले. यातील एकाने माझ्यादिशेने गोळीबार केला. मात्र यावेळी मी गोळी चुकवली. खांद्याला घासून गोळी गेली. दुचाकीही खाली पडली. दरम्यान, आसपासच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार युवकाची गाडी पडली, पण गोळीबाराचा आवाज ऐकला नाही. या घटनेने खळबळ उडून घटनास्थळी पोलीस आले. त्यांना घटनास्थळी पुंगळय़ा आढळून आल्या नसल्याचे सांगण्यात आले. हा तपास सध्या स्थानिक गुन्हेकडे देण्यात आला आहे. याबाबत अजूनही शहर पोलिसात गुन्हा दाखल नाही.

Related posts: