|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » विरोधकांना टेंभुसह सर्वत्र मीच दिसतो

विरोधकांना टेंभुसह सर्वत्र मीच दिसतो 

तुमच्या लाल दिव्यात माझेही योगदान:

प्रतिनिधी/ आटपाडी

सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुक सुरू आहे. आम्ही विकासाच्या अजेंडय़ावर लोकांसमोर जातोय. परंतू फक्त निवडणुकीसाठी घरातून बाहेर पडणाऱयांना माझ्याशिवाय दुसरा मुद्दाच नाही. त्यांना टेंभुसह सर्वत्र मीच दिसतोय, असा आरोप करत तुमच्या लाल दिव्यात माझेही योगदान आहे. असा दावा आमदार अनिल बाबर यांनी केला.

आटपाडी तालुक्यातील तडवळे येथे आयोजित शेटफळे पंचायत समिती गणातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार अनिल बाबर बोलत होते. माजी जि.प.सदस्य तानाजी पाटील, विष्णुपंत पाटील, सुबराव पाटील, ऍड.सर्जेराव खिलारी, नंदकुमार दबडे, दत्तात्रय यमगर, आबासो भुते, सोमेश्वर गळवे, सोमनाथ गायकवाड, विजय यादव, दत्तात्रय गिड्डे, शरद गिड्डे, सत्यवान गिड्डे, सुदाम गिड्डे, सतिश गिड्डे, सोमनाथ पावले, विकास गिड्डे, सुरेश गिड्डे, विलास गिड्डे, बाळासाहेब जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार अनिल बाबर यांनी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्यावर टिका करताना निवडणुक पंचायत समिती व जिल्हा परिषदेची असून मी उमेदवार नसून विकासाच्या मुद्दय़ावर बोला, असे आव्हान केले. निवडणुकीसाठीच घरातून बाहेर पडता आणि दिशाभुल करून मते मागता. पावसाळय़ात वाहुन जाणारे पाणी टेंभुव्दारे आणुन शेतकऱयांना दिलासा दिला.

त्याचे 9 कोटी वीजबील शासनाने भरले. आटपाडी तालुक्यातील अनेक भागातील शेतकऱयांना या पाण्याचा लाभ झाला. त्यावेळी फक्त पाय धुण्यासाठीच पाणी आल्याची टिका विरोधकांनी केल्याचा आरोप करत त्यांचे पाय किती मोठे आहेत? असा सवालही आमदार अनिल बाबर यांनी केला. तुम्हाला जिल्हा परिषदेचा लालदिवा मिळाला. त्यात माझेही योगदान आहे. माझा तुम्ही मांडलेल्या ठिबकला विरोध आहे, असे सांगता. तुम्हाला योजना मांडता आली नाही. त्याचे खापर दुसऱयावर का फोडता, असा सवालही आमदार बाबर यांनी केला. तुम्ही ठिबकच्या योजनेसाठी या अवघ्या 3 महिन्यात मान्यता मिळवुन देतो, असा दावा करत मला मोठेपणा देणाऱया शेतकऱयांच्या चेहऱयावरील आनंद बघण्यासाठीच मी आमदार झालोय. तो आनंद शेतकऱयांना देणार, असा विश्वासही आमदार अनिल बाबर यांनी व्यक्त केला.

तानाजी पाटील यांनी विरोधकांवर टिकास्त्र सोडताना आम्ही विकासावर बोलुन मते मागतो आणि ते लोकांना भुलवुन मते मागतात, असा आरोप केला. आम्ही जिल्हा परिषद व आमदारकीच्या माध्यमातून कोटय़ावधींची कामे तालुक्यात केली. पण, करगणी गटाचे प्रतिनिधीत्त्व करणाऱया जि.प.च्या माजी अध्यक्षांनी विकासाचा एक तरी नारळ फोडला काय? आम्ही 56गावात विकासकामे सांगतोय. तुम्ही तुमची निष्क्रीयता घोषीत करा. दुसऱयांचे पाय ओढु नका. कामे करता येत नसतील तर पाय तरी ओढु नका.

तालुक्याच्या कारभारी चुकीचा लागल्याने जनतेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता त्यांना दुसऱयांच्या वळचणीला बसावे लागतेय. उघड मैदानात या. विधानसभेसारखेच चित्र पहायला मिळेल, असा आव्हानही तानाजी पाटील यांनी दिले. अध्यक्षपदानंतर जिल्हा परिषदेच्या मिटींगला न जाणाऱयांनी विकासाच्या मुद्दय़ावरच बोलावे, असे सांगत जनतेने जातीच्या राजकारणावर आणि भुलथापांच्या मुद्दय़ावर मते मागणाऱयांना बाजुला करावे, असे आवाहनही तानाजी पाटील यांनी केले.

सोमेश्वर गळवे, महेश कापसे, विकास गिड्डे, सुरेश गिड्डे यांनी मनोगते व्यक्त करत विकासाच्या भुमिकेवर जनतेचे बळ आमदार अनिल बाबर व तानाजी पाटील यांच्या पाठीशी उभे करण्याचे आवाहन केले. सुत्रसंचलन परशुराम पवार यांनी केले. अण्णासो रणदिवे, हणमंत गिड्डे, उत्तम माने, दादा कुचेकर, सर्जेराव काळे, विलास बारवकर, बाळासाहेब सरगर, सत्तार मुल्ला यांच्यासह शेटफळे पंचायत समिती गणातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार अनिल बाबर, तानाजी पाटील व मान्यवरांच्याहस्ते विजय यादव, सुरेश गिड्डे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.

Related posts: