|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सारस्वत भवनमधील रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सारस्वत भवनमधील रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

दसरा चौकातील सारस्वत भवनमध्ये सारस्वत विदयार्थी वसतिगृह आणि छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विदयमाने आयोजीत रक्तदान शिबीरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवून शिबीर यशस्वी पार पाडले. 

ग्रामीण भागातील गरीब व गरजू रूग्णांना योग्यवेळी रक्त न मिळाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागतात. अशा गरजू व गरीब रूग्णांना गरजेवेळी रक्त मिळावे या एकाच उददेशाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला वसतिगृह विदयार्थी व समाजातील अनेक नवयुवकांनी सहभाग नोंदविला होता. सारस्वत वसतिगृहामध्ये सतत सामाजिक बांधीलकी जपणारे कार्यक्रम राबविण्यात येतात. ‘रक्तदान म्हणजे जीवनदान’ याच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वसतिगृहाचे विश्वस्त, पदाधिकारी, विदयार्थी व त्यांचे मित्र,नातेवाईक आणि सारस्वत समाजबांधव यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होवून रक्तदान शिबीर यशस्वीपणे पार पाडले.

यावेळी सारस्वत विदयार्थी वसतिगृहाचे अध्यक्ष डॉ.गजानन आसगेकर, उपाध्यक्ष सिध्दार्थ लाटकर तसेच सारस्वत विकास मंडळाचे अध्यक्ष कुलदीप कामत, उपाध्यक्ष सचिन जनवाडकर, डॉ.यशस्विनी जनवाडकर, सुमंगला पै, मोहन देशपांडे, अनुराधा तेंडुलकर, अधिक्षक संजय भोपळे-पाटील, सीपीआरचे अधिकारी, विदयार्थी प्रतिनीधी निरंजन चौगले, कर्मचारी उपस्थित होते.