|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात प्रचारासाठी ओवेसींना परवानगी नाकारली

पुण्यात प्रचारासाठी ओवेसींना परवानगी नाकारली 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुण्यात येत्या 14 फेबुवारीला होणाऱया प्रचारासाठी एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असुद्दुदीन ओवेसी यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव परवानगी नाकारण्यात आली.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या प्रचारासाठी सर्वच पक्ष जोरदार प्रयत्न करत आहे. पुणे महानगरपालिकांच्या निवडणुकीत ओवेसी बंधूंचा एमआयएम पक्ष आपली ताकद आजमावणार असून याच पार्श्वभूमीवर एमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी असुद्दुदीन ओवेसी यांची 14 फेब्रुवारीला जाहीर सभा होणार होती. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या प्रचारसभेला परवानगी नाकारण्यात आली.