|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » leadingnews » पाकिस्तानात 2 हजारांच्या बनावट नोटांची छपाई सुरू

पाकिस्तानात 2 हजारांच्या बनावट नोटांची छपाई सुरू 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या विविध कारणांसाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला त्यातील एक प्रमुख कारण होते पाकिस्तानात छापल्या जाणाऱया बनावट नोटा भारतीय चलनातील 500 आणि 1 हजार रूपयांचा बनावट नोटा पाकिस्तानात छापल्या जात होत्या हे सुध्दा नोटाबंदीच्या निर्णयामागचे एक प्रमुख कारण होते. पण आता पाकिस्तानाने पुन्हा एकदा भारतीय चलनातील 2 हजार रूपयांचा बनावट नोटा छापण्यास सुरूवात केल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.

या नोटा तस्करांमार्फत भारत-बांगलादेश सीमेवरून भारतात आणल्या जात असल्याची माहिती आहे. एनआयए आणि बीएसएफने मुर्शिदाबाद येथून अटक केलेल्या अझीझूर रहमानच्या चौकशीत
tन धक्कादायक माहिती समोर आली आहे. तो मुळचा पश्चिम बंगालमधील मालदाचा निवासी आहे. त्याच्याकडे 2 हजार रूपयांच्या 40 बनावट नोटा सापडल्या. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या मदतीने या नोटा पाकिस्तान छापण्यात आल्याची माहिती त्याने चौकशीत दिली, बांगलादेश सीमेवरून या नोटांची तस्करी चालते असे त्याने सांगितले.

Related posts: