|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » चांगभलं’च्या गजरात भावेश्वरी यात्रेची सांगता

चांगभलं’च्या गजरात भावेश्वरी यात्रेची सांगता 

प्रतिनिधी/ संकेश्वर

दड्डी-मोहनगे पंचक्रोशीतील नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असणारी श्री भावेश्वरी देवीच्या यात्रेची सोमवारी रात्री पालखी उत्सवाने सांगता करण्यात आली. यात्रा काळातील तीन दिवसात 4 लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.

सोमवारी सायंकाळी पालखी सोहळय़ाला प्रारंभ झाला. पालखी मंदिर परिसरासह गावभागातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत असताना ठिकठिकाणी महिलावर्गाने औक्षण करीत पालखीवर खारीक, खोबऱयाची उधळण करण्यात येत होती. विविध वाद्यांसह मानकरी, हक्कदारांनी, आपापल्या पारंपरिक रिवाजाच्या थाटात पालखीची सेवा बजावली. पालखी गावाभागातून मंदिरात पोहोचल्यानंतर यात्रेची सांगता झाल्याचे घोषित करण्यात आले. यात्रेला उपस्थित राहिलेले पाहुणे, मित्रमंडळींनी मोठय़ा संख्येने माघारी परतत होते. तीन दिवसाच्या प्रचंड वर्दळीने मंदिर परिसर गजबजून गेला होता. यात्रेला आलेल्या सर्वच व्यापाऱयांची मोठय़ा प्रमाणात उलाढाल झाल्याची चर्चाही होती.

यात्रा यशस्वी करण्यासाठी श्री भावकाईदेवी पाटील ट्रस्ट कमिटी व पाटील मित्रमंडळ, मोदगे (मुंबई) चे अध्यक्ष भाऊराव पाटील, सेपेटरी संतराम पाटील, सदस्य चंद्रकांत पाटील, सुधाकर पाटील, भागोजी पाटील, अशोक पाटील, नंदकुमार पाटील, मारुती पाटील, संतू पाटील यांच्यासह सलामवाडी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा भागव्वा कुनुरे, उपाध्यक्षा वंदना कळवीकटे, ग्रामविकास अधिकारी संजीव शिवनाईक, सदस्य मारुती पाटील, अर्जुन केळापागावडे, संजय पाटील, रेणुका नाईक, कृष्णा कोकितकर, गीता कुंभार, जनार्दन पाटील व रत्नाबाई मांग यांच्यासह गावातील विविध संघटनेचे कार्यकर्ते, पोलीस अधिकारी आदींनी विशेष परिश्रम घेतले

Related posts: