|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » त्या’ आरोपीचे रेखाचित्र तयार

त्या’ आरोपीचे रेखाचित्र तयार 

वार्ताहर / हुक्केरी

   येथील डॉ. राजीव यांच्या निवासस्थानातून 22 तोळे सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या आरोपींचे पोलिसांनी रेखाचित्र तयार केले आहे. सदर वर्णनाची व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन हुक्केरी पोलिसांनी केले आहे.

शनिवारी सकाळी 10.30 वाजता एका भामटय़ाने डॉ. राजीव यांनी घराची दुरुस्तीसाठी तपासणी करण्यास आपल्याला पाठविल्याचे सांगून त्यांच्या बंगल्यात प्रवेश केला होता. यावेळी राजीव यांचे सासू-सासरे व मोलकरणीची दिशाभूल करीत तिजोरीतील 22 तोळे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला. या घटनेने हुक्केरी पोलिसांसमोर चोरटय़ांचे आव्हान निर्माण झाले आहे.

सोमवारी पोलिसांनी डॉ. राजीव यांचे सासू-सासरे व मोलकरणीला बेळगाव येथील पोलीस मुख्यालयात हजर करून त्यांनी वर्णन केलेल्या व्यक्तीचे रेखाचित्र तयार केले आहे. या रेखाचित्राच्या वर्णनाची व्यक्ती आढळून आल्यास त्वरित मंडल पोलीस निरीक्षक मोबाईल क्रमांक 9480804036, पोलीस उपनिरीक्षक मोबाईल क्र. 9480804071 यासह 08333-266033 या पोलीस ठाण्याच्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हुक्केरीत या घटनेपूर्वीच्या चारच दिवसात 8 ठिकाणी चोरांनी घरफोडी केली होती. ही घटना ताजी असतानाच डॉ. राजीव यांच्या निवासस्थानी प्रवेश करून 22 तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याच्या घटनेने शहरात भीतीचे पसरले आहे.

Related posts: