|Thursday, November 14, 2019
You are here: Home » leadingnews » लग्नाचा खर्च महागात पडणार ; 10 टक्के रक्कम गरिबांना द्यावी लागणार

लग्नाचा खर्च महागात पडणार ; 10 टक्के रक्कम गरिबांना द्यावी लागणार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

लग्नसमारंभात आपल्या संपत्तीचे जाहीर प्रदर्शन करणाऱयांना आता सामाजिक कार्यासाठी हातभार द्यावा लागणार आहे. त्यामुळे 5 लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम खर्च करणाऱयांना एकूण रकमेच्या 10 टक्के रक्कम गरीब मुलींच्या लग्नासाठी द्यावी लागणार आहे. याबाबतचे विधेयक लवकरच लोकसभेत मांडले जाणार आहे.

weds

सध्या अनेक लग्नसमारंभामध्ये संपत्तीचे जाहीर प्रदर्शन होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे लग्नसमारंभात पाच लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम खर्च केल्यास त्यातील खर्चाच्या एकूण 10 टक्के रक्कम ही गरीब मुलींच्या लग्नासाठी द्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या आगामी अधिवेशनात काँग्रेसच्या खासदार रंजित रंजन यांच्याकडून याबाबतचे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यास लग्नात खर्च करण्यात आलेल्या एकूण रकमेच्या काही रक्कम ही गरजू लोकांना देण्याचे बंधनकारक करण्यात येणार आहे.

Related posts: