|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » पाकमधील दहशतवादी हल्ल्यात 50 ठार

पाकमधील दहशतवादी हल्ल्यात 50 ठार 

कराची  /  वृत्तसंस्था

पाकिस्तानमधील मशिदीमध्ये आत्मघातकी स्फोट घडवून आणल्याने 50 लोकांचा मृत्यू झाला. याव्यतिरिक्त 100 जण जखमी झाले. सिंध प्रांतातील सेहवान शहरात गुरुवारी रात्री हा स्फोट घडवून आणला. या आठवडय़ात पाकिस्तानमध्ये करण्यात आलेला हा पाचवा दहशतवादी हल्ला आहे. हल्लेखोराने लाल शहबाज मशिदीमध्ये घुसत प्रतिदिनी होणाऱया धमाल या सुफी नृत्य कार्यक्रमावेळी स्फोट घडवून आला. यावेळी मशिदीत शेकडो भाविक उपस्थित होते. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांची संख्या वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. 2005 पासून पाकमधील 25 पेक्षा अधिक मशिदींवर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे.

Related posts: