|Thursday, November 21, 2019
You are here: Home » उद्योग » सप्ताह अखेरीस बाजाराची दमदार कामगिरी

सप्ताह अखेरीस बाजाराची दमदार कामगिरी 

बीएसईचा सेन्सेक्स 167, एनएसईचा निफ्टी 43 अंशाने वधारला

वृत्तसंस्था / मुंबई

सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी देशी बाजाराने शानदार सुरुवात केली. मात्र वरच्या पातळीवर टिकून राहण्यास अपयशी ठरला. निफ्टीने 8896 पर्यंत मजल मारली होती, सेन्सेक्स 425 अंशाने मजबूत होत 28,726 वर पोहोचला होता.

बीएसईचा 30 समभागांचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 167 अंशाने मजबूत होत 28,469 वर बंद झाला. एनएसईचा 50 समभागांचा प्रमुख निर्देशांक निफ्टी 43 अंशाने मजबूत होत 8,821 वर बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात तेजी दिसून आली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.5 टक्क्यांनी वधारत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.5 अंशाच्या तेजीने बंद झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.4 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाला.

फार्मा, बँकिंग, ऑईल ऍन्ड गॅस, ग्राहकोपयोगी वस्तू आणि पॉवर समभागात सर्वात जास्त खरेदी झाली. बँक निफ्टी 1.5 टक्क्यांनी मजबूत होत 20,551 च्या स्तरावर बंद झाला. बँक निफ्टी 21 हजाराचा टप्पा पार करण्यास यशस्वी ठरला. निफ्टीचा फार्मा निर्देशांक 2 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाला. बीएसईचा ऑईल ऍन्ड गॅस निर्देशांक 1.4 टक्क्यांनी वाढत बंद झाला.

आयटी, मेटल आणि पीएसयू बँक समभागात विक्री दिसून आली. निफ्टीचा आयटी निर्देशांक 1 टक्के, मेटल निर्देशांक 0.7 टक्के आणि पीएसयू बँक निर्देशांक 0.25 टक्क्यांनी घसरत बंद झाले.

दिग्गज समभागांची कामगिरी

सन फार्मा, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक आणि सिप्ला 4-1.5 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाले. भारती इन्फ्रा, हिंडाल्को, आयडिया, टीसीएस, हीरो मोटो, इन्फोसिस, विप्रो आणि एशियन पेन्ट्स 3.6-0.9 टक्क्यांनी घसरत बंद झाले.

मिडकॅप समभागात रिलायन्स कॅपिटल, आदित्य बिर्ला फॅशन, कॅस्ट्रोल, पेट्रोनेट एलएनजी आणि एमआरपीएल 5.7-3.5 टक्क्यांनी वधारत बंद झाले. स्मॉलकॅप समभागात जेपी इन्फ्रा, आयएफबी इन्डस्ट्रीज, एचबीएल पॉवर, बीएल कश्यप आणि जेपी असोशिएट्स 11.1-10 टक्क्यांनी वधारत बंद झाले.

 

Related posts: