|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » विकासासाठी भाजपचा महापौर करा : वैंकय्या नायडू

विकासासाठी भाजपचा महापौर करा : वैंकय्या नायडू 

वार्ताहर/ सोलापूर

केंद्र आणि राज्यात केवळ भाजपच पारदर्शक विकास करू शकतो. स्मार्ट सिटीचे काम अधिक वेगाने करण्यासाठी सोलापूर महापालिकेवर भाजपचा महापौर पाहिजे. म्हणून सोलापूरकरांनी भाजपला स्पष्ट बहुमत दिल्यास दिल्ली, मुंबई, सोलापूर असा थेट विकास कनेक्शन बनेल असे केंद्रीय नगर विकास मंत्री वैंकय्या नायडू म्हणाले. भाजप प्रचारार्थ सोलापूरातील त्यांच्या सभा पार पडल्या.

भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराच्या वतीने सोलापूर शहराच्या वतीने लक्ष्मीनारायण टॉकीज जवळील बालाजी गार्डन हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत व्यंकय्या नायडू बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार ऍड. शरद बनसोडे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख, शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू, माजी आमदार नरसिंह मेंगजी, भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य रघुनाथ कुलकर्णी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना व्यंकय्या नायडू म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हाणाला प्रतिसाद देत ज्या लोकांनी गॅस सबसीडी परत केली त्यापोटी 125 कोटी रूपये शासनाकडे जमा झाले आहेत.

 40 हजार घरांची किल्ली आम्ही देऊ.

सोलापूरला 30 हजार घरकुले मंजूर झाली आहेत. ही घरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूर केली असून आणखी 10 हजार घरांची भर घालून एकूण 40 हजार घरे देणार आहोत. ज्यांना घर नाही अशा सर्वसामान्य जनतेमधील प्रत्येकाला घर दिले जाणार आहे असेही यावेळी व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. घरे देण्याचे काम जिल्हाधिकाऱयांकडे असल्याने कोणीही त्यावर पोळी शेकू नये. घरे देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱयांना असतात ते आम्ही बघू से म्हणत आडम मास्तरांना सुनावल.s

दिल्ली, मुंबई, सोलापूर हेच विकासाचे समीकरणे

सोलापूरकरांनी केंद्रात नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस, तसेच सोलापूरात बाजपचा महापौर करावा. त्यामुळे विकास थेट आणि वेगाने होण्यासाठी भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमता बरोबर एकहाती सत्ता द्या असे आवाहन केले. विशेष म्हणजे दिल्ली, मुंबई, सोलापूर हेच विकासाचे समीकरण बनविण्याचे आवाहन व्यंकय्या नायडू यांनी केले.

भाजपचे 11 कोटी सदस्य

भारतीय जनता पार्टी ही एकमेव अशी पार्टी आहे की ज्याचे देशभरातून 11 कोटी सदस्य आहेत. आज एकमेव पक्ष असा आहे की तो दिवसे वाढत चालला आहे. केंद्र शासनाने नोटा बंदी केल्यामुळे कोटय़ावधी रूपये बँकेत जमा झाले आहेत. हा पैसा कोणाचा आहे. कसा आला आहे याची चौकशी केला जाणार आहे असल्याचेही केंदीय नागरी विकास मंत्री व संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केले.