|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात मुख्यमंत्र्यांचा फज्जा; सभा रद्द करण्याची भाजपावर नामुष्की

पुण्यात मुख्यमंत्र्यांचा फज्जा; सभा रद्द करण्याची भाजपावर नामुष्की 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुण्यात न्यू इंलिश स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे सर्वांनीच पाठ फिरवल्याने या सभेचा आज फज्जा उडाला. या सभेला गर्दी नसल्याने अखेर ही सभा मुख्यमंत्र्यांना रद्द करावी लागली असून, भाजपासाठी ही मोठी नामुष्की मानली जात आहे.

महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी अवघा एक दिवस राहिल्याने सागळय़ाच पक्षांनी ताकद लावली आहे. त्यापार्श्वभूमीवर पुण्यात मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा दुपारी 1.30 आयोजित केली होती. मात्र या सभेकडे पुणेकरांनी पाठ फिरवली. सभेला चिटपाखरू नसल्याने मुख्यमंत्र्यांनी खालीच थांबणे पसंत केले. मात्र, परिस्थितीत कोणतीही सुधारणा न झाल्याने मुख्यमंत्र्यांना अखेर काढता घ्यावा लागला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही सभा रद्द केल्याचे ट्विटरच्या माध्यमातून सांगितले.