|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » leadingnews » पलानीस्वामींनी सिद्ध केले बहुमत

पलानीस्वामींनी सिद्ध केले बहुमत 

ऑनलाईन टीम / तामिळनाडू :

तामिळनाडूत सत्त संघर्षला पूर्ण विराम मिळाला असून अखेर तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी बहुमत सिद्ध केले आहे. त्यांनी 122 आमदारांच्या पाठिंब्यासह तामिळनाडू विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला.

द्रमुकच्या आमदारांनी तोडफोड आणि गदरोळ केल्यामुळे त्यांना सभागृहाबाहेर काढल्यानंतर विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी अण्णद्रमुकचे आणि पन्नीरसेल्वम गटाचे आमदार उपस्थित होते. द्रमुकचे 88 आणि आययूएमएलच्या एक असे मिळून 89 आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आले होते. अखेर तामिळनाडूचे राजकीय नाटय़ संपले असेच म्हणावे लागेल.

 

Related posts: