|Monday, September 23, 2019
You are here: Home » क्रिडा » रोमांचक लढतीत लंकेचा ऑस्ट्रेलियावर मालिका विजय

रोमांचक लढतीत लंकेचा ऑस्ट्रेलियावर मालिका विजय 

वृत्तसंस्था / मेलबोर्न

लंकेने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियावर 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. रविवारी येथे झालेल्या दुसऱया सामन्यात लंकेने ऑस्ट्रेलियाचा दोन गडय़ांनी पराभव केला. लंकेच्या असेला गुणरत्नेला ‘सामनावीर‘ म्हणून घोषित करण्यात आले.

गिलाँगच्या स्टेडियमवर हा पहिलाच ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय सामना खेळविला गेला. मेलबोर्नच्या दक्षिणकडे असलेल्या या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय सामना पाहण्यासाठी शौकिनांनी गर्दी केली होती. दिवस-रात्रीच्या या दुसऱया सामन्यात गुणरत्नेने शेवटच्या चेंडूवर विजयी चौकार मारून लंकेच्या मालिका विजयावर शिक्कामोर्तब केला.

या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलियाचा डाव 20 षटकांत डाव 173 धावात आटोपला. त्यानंतर लंकेने 20 षटकांत 8 बाद 176 धावा जमवित सामना आणि मालिका जिंकली.

 

ऑस्ट्रेलियाच्या डावात हेन्रिक्सने 37 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 56, क्लिनगेरने 37 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 43, डंकने 14 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 32, कर्णधार फिंचने 10 चेंडूत 2 चौकारांसह 12 केल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात पहिल्या चार फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठल्यानंतर उर्वरित फलंदाज लवकर बाद झाले. क्लिनगेर आणि डंक यांनी दुसऱया गडय़ासाठी 45 धावांची तर क्लिनगेर आणि हेन्रिक्स यांनी तिसऱया गडय़ासाठी 70 धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियाच्या डावात 6 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. लंकेच्या कुलशेखराने 31 धावांत 4 तर मलिंगा आणि बंदारा यांनी दोन गडी बाद केले. गुणरत्ने व प्रसन्ना यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.

 

प्रत्युत्तरादाखल खेळताना असेला गुणरत्नेने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 46 चेंडूत 5 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 84 धावा  झळकवित संघाला शेवटच्या चेंडूवर थरारक विजय मिळवून दिला. केंपूगेदराने गुणरत्नेसमवेत सहाव्या गडय़ासाठी 52 धावांची भागिदारी केली. केंपूगेदराने 32 चेंडूत 4 चौकारांसह 32, कुलशेखराने 8 चेंडूत 2 चौकारांसह 12, डिक्वेलाने 8 चेंडूत 3 चौकारांसह 14 आणि मुनव्हेराने 4 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 10 धावा जमविल्या. लंकेच्या डावात 6 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे टिएने 36 धावांत 3, फॉकनेरने 32 धावांत 2 गडी बाद केले. टर्नर आणि कमिन्स आणि रिचर्डसन यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. या सामन्यात लंकेची पाचव्या षटकाअखेर स्थिती 5 बाद 40 अशी केविलवाणी होती पण त्यानंतर केंपूगेदरा, गुणरत्ने यांनी आक्रमक फलंदाजी करून संघाला विजय मिळवून दिला. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ऍडलेड ओव्हलवर येत्या बुधवारी होणार आहे.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया- 20 षटकांत सर्वबाद 173 (हेन्रिक्स नाबाद 56, क्लिनगेर 43, डंक 32, कुलशेखरा 4/31, मलिंगा 2/31, बंदारा 2/32),

लंका- 20 षटकात 8 बाद 176 (गुणरत्ने नाबाद 84,