|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पत्रकार चषक क्रिकेटमध्ये केपे वॉरियर्स, कुडचडे यूथचे विजय

पत्रकार चषक क्रिकेटमध्ये केपे वॉरियर्स, कुडचडे यूथचे विजय 

क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव

सावर्डे जिमखानाने आयोजित केलेल्या पत्रकार चषक झटपट क्रिकेट स्पर्धेत काल खेळविण्यात आलेल्या सामन्यात केपे वॉरियर्स व कुडचडे यूथ संघांनी विजय नोंदविले व पुढील फेरीत प्रवेश मिळविला.

सागच्या कुडचडे क्रीडा संकुलाच्या मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात केपे वॉरियर्सने आमोणाच्या साईबाबा क्रिकेट क्लबचा 50 धावांनी पराभव केला तर दुसऱया सामन्यात कुडचडे यूथने केपे स्पोर्ट्स क्लबला 7 धावांनी पराभूत केले.

संक्षिप्त धावफलक: केपे वॉरियर्स, 20 षटकांत 7 बाद 187 (व्यंकटेश नेवगी 77, आदीत्य आंगले 28, संदीप दलाल 20 धावा. उद्देश गांवकर 3-36, शंकर गांवकर 2-26, तुकाराम गांवस 2-25) वि. वि. साईबाबा क्रिकेट क्लब, 20 षटकांत 6 बाद 137 (अभिषेक कोठंबीकर 49, शंकर गांवकर 29, उद्देर गांवस 19 धावा. व्यंकटेश नेवगी 3-21, आदीत्य आंगले 2-15, ऋषिकेश नाईक 1-24). सामनावीर- व्यंकटेश नेवगी (केपे वॉरियर्स).

कुडचडे यूथ, 18 षटकांत 7 बाद 142 (महेश कुडचडकर 47, सुदेश राणे 20, विश्वेश देसाई 24 धावा. आनंद केरकर 3-21, दत्तेश बोरकर 1-9, केदार फळदेसाई 1-27) वि. वि. केपे स्पोर्ट्स क्लब, 18 षटकांत 5 बाद 135 (राजदीप फातर्पेकर 32, साईदीप गोवेंकर 23, स्वप्नील गोडसे 21 धावा. विश्वेश देसाई 1-24, स्वीकार परब 1-25, समर्थ तेली 1-16). सामनावीर- महेश कुडचडकर (कुडचडे यूथ).

Related posts: