|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जिल्हा परिषदेचे बजेट सादर करण्याचा अधिकार ‘सीईओं’ना

जिल्हा परिषदेचे बजेट सादर करण्याचा अधिकार ‘सीईओं’ना 

प्रतिनिधी / सातारा

जिल्हा परिषदेचे 2017-18 चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मंजूर करण्याचे आधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यमान सदस्यांची बजेट सादर करण्याची स्वप्ने धुळीला मिळाली असून नवीन सदस्यांसमोर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख हे बजेट सादर करणार आहेत.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अर्थसंकल्प नियम 1966 कलम नुसार जिल्हा परिषदांचे अर्थसंकल्प 27 मार्चपर्यंत मंजूर करणे आवश्यक आहे.

सातारा जिह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मंगळवारी मतदान होत आहे. त्यांचा निकाल 23 रोजी लागणार आहे. मात्र, जिल्हा परिषदेला  27 मार्चपूर्वी बजेटची सभा घेणे जमणार नाही. त्यामुळे राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे 2017-18 चे मुळ बजेट मंजूर करण्याचे अधिकार हे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना देण्यात आले आहेत.

त्यामुळे ही निवडणूक संपल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बजेटसाठी सर्वसाधारण सभा तर गटविकास अधिकाऱयांनी तालुक्यात बजेटसाठी सभा घेवून सभेत बजेट मांडावे लागणार आहे.  जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाचे मिळून 2017-18 चे मुळ बजेट अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मांडून ते मंजूर करुन ते नव्याने येणाऱया जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या सभेत मांडावे लागणार आहे.

Related posts: