|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वाळपईत समाजकंटकांनी केलली कृत्य निंदनीय

वाळपईत समाजकंटकांनी केलली कृत्य निंदनीय 

प्रतिनिधी / वाळपई

वाळपई नगरपालिका क्षेत्रात शिवजयंती साजरी करण्यासाठी कार्यक्रमाचा बॅनर लावण्यात आल्यानंतर काही समाजकंटकांनी जबरदस्तीने सदर बॅनर काढण्याचा केलेला प्रयत्न व यामुळे वाळपईत समाजकंटकांच्या विरोधात उभे राहिलेले आंदोलन यातून येणाऱया काळात अनेक अनिष्ट गोष्टींची चाहूल दिसू लागली आहे. कारण वाळपईच्या इतिहासात अशा स्वरुपाची घटना प्रथमच झाल्याने येणाऱया काळात अशा गोष्टींना खतपाणी घालण्याचा प्रकार होऊ नये, याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. या   घटनेबाबत सर्व स्तरातून निषेध होत असून दोन्ही समाजातील बांधवांनी एकत्र येऊन हा तिढा सोडवावा अशी मागणी होत आहे. 

 वाळपई शहरात गेल्या काही वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात वाढणारी परप्रांतीयांची संख्या  याकडे राजकीय स्तरावरून होणारा निष्काळजीपणा याचे गंभीर परिणाम आपणास येणाऱया काळात निश्चितपणे दिसणार आहेत. यामुळे वर्तमानपत्रात वारंवारपणे परप्रांतीयांची वाढती संख्या व बिघडत चाललेला सामाजिक एकोपा यावर अनेकवेळा आवाज उठविण्यात आला आहे. मात्र वाळपई पोलिसांनी, सरकारने याकडे गांभीर्याने पाहण्याकडे कोणतेही लक्ष दिलेले नाही. त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत.

वाळपईत सदर प्रकाराने निर्माण झालेली स्थिती यावर सर्वत्र नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. गेली अनेक वर्षे हिंदू-मुस्लिम बांधवांत चांगल्या स्वरुपाचे संबंध सर्वश्रुत आहेत. येथील सामाजिक एकता बिघणार नाही याची वारंवार काळजी विविध समाजबांधवांनी घेतलेली आहे. मात्र बॅनर हटाव प्रकरणाने या संबंधित दरी निर्माण होणार नाही अशा स्वरुपाचा प्रश्न प्रकर्षाने निर्माण झाला आहे. वाळपई भागात शिवजयंती साजरी करण्याची प्रथा सर्वप्रथम सत्तरी पत्रकार संघाने केली होती. मात्र अनेक वर्षांनंतर सत्तरी पत्रकार संघाने हा सोहळा सार्वजनिक स्तरावर होण्यासाठी समविचारी शिवप्रेमींची बैठक बोलावून सदर सोहळा सर्वव्यापी करण्यावर अनेक वर्षांपासून भर दिला आहे. यंदाचा सोहळा याच पद्धतीचा भाग होता. या संबंधीचा लावण्यात आलेला बॅनर काही समाजकंटकांनी जबरदस्तीने काढण्याचे धाडस केले. नंतर जवळपास 4 हजारांच्या आसपास शिवप्रेमींच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक (पूर्वीचा हातवाडा) भागात शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे याच भागाचे शिवाजी महाराज चौक असे नामकरण करण्यात आले आहे. जनतेच्या विचारांतून हा समाज प्रबोधनाची संकल्पना आहे. सध्या वाळपई पालिका सदर मूर्ती कोणत्याही अवस्थेत हटविण्याचा प्रयत्नात आहे. यामुळे नागरिकांत नाराजीचा सूर पसरलेला आहे. सदर स्वरुपाचा प्रकार घडल्यास पुन्हा एकदा आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. कारण सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. या वातावरणात हात घालण्याचा प्रयत्न झाल्यास वाळपई पालिकेला अडचण होऊ शकते. सदर मूर्ती हटविण्याचे जनताविरोधी काम करून आपली शक्ती वाया घालविण्यापेक्षा वाळपई पालिकेने आपल्या क्षेत्रात बेकायदेशीरपणे वास्तव्य करून सामाजिक एकतेला बाधा निर्माण करणाऱया समाजकंटकांना हेरून त्यांना धडा शिकविण्याची मागणी वाळपई वासियांनी केली आहे.

काही वर्षांपासून या भागात चोऱया, तरुणींची छेडछाड करण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणात वाढत आहेत. काही वर्षांपूर्वी गणेशचतुर्थी सणात आरती, भजन अशा धार्मिक प्रक्रियांना काही समाजकंटकांनी बाधा आणण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी इतर समाजबांधवांनी आवाज उठवून सदर प्रकारांना सडेतोड जबाब दिला होता. यावेळीही दोन्ही समाजाच्या बांधवानी एकत्र येऊन हा तिडा सोडविला पाहिजे.

Related posts: