|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » मतसंग्राम : मुख्यमंत्र्यांनी बजावला मतदानाचा हक्क

मतसंग्राम : मुख्यमंत्र्यांनी बजावला मतदानाचा हक्क 

ऑनलाईन टीम / नागपूर :

महापालिका निवडणुसाठी आज मतदानाला सुरूवात झाली. मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पहायला मिळत आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर मुख्यमंत्री   देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा नागपुरात मतदानाचा हक्क बजावला आहे.

सकाळी 7 :30 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून पुणे आणि मुंबईमध्ये मतदानाला चांगला प्रतिसाद पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.