|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » नांदेडमध्ये काँग्रेसची आघाडी

नांदेडमध्ये काँग्रेसची आघाडी 

पुणे / प्रतिनिधी

काँगेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा गड असलेल्या नांदेडमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. पक्षाचे 13 उमेदवार आघाडीवर आहेत.

नांदेड जिल्हा परिषदेत मागील खेपेला राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर काँग्रेसची सत्ता होती. 63 सदस्यांच्या परिषदेत काँग्रेसचे सर्वाधिक 25 सदस्य होते. राष्ट्रवादी काँग्रेस 18, शिवसेना 9, भाजपा 3, लोकभारती 1, शेकाप 1, अपक्ष 3 असे बलाबल होते.

नांदेड हा अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे त्यांच्यासमोर पहिले आव्हान परिषदेत स्वबळावर सत्ता आणण्याचे होते. 1997, 2002 व 2007 मध्ये काँग्रेसला बहुमत मिळविता आले नव्हते. हे पाहता यंदाच्या निकालाबाबत उत्सुकता होती. आत्तापर्यंत आलेल्या निकालावरून काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

Related posts: